हिट अँड रन चा फटका ;संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यात अनेक पंपांवर रांगा

Hit and run hit; Queues at many pumps in the state on the second day of the strike

वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत . कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती केंद्राला दिली जाणार आहे.

धुळे शहरात सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्र सरकारने मोटर कायद्यामध्ये त्वरित बदल करून वाहक व चालकांच्या मागण्या पूर्ण करून संप मिटवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरुन पेट्रोलमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील केंद्र सरकारने काळजी घ्यावी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

नाशिकच्या मनमाडजवळील नागापूर व पानेवाडी इंधन प्रकल्पातून होणारी इंधनाची वाहतूक बंद असल्याने उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भातील पाच -सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्यास सुरुवात झाली आहे.

काल संपावर दोन बैठका झाल्या मात्र निष्फळ ठरल्या. त्यामुळे आजही संप सुरूच आहे. आता कायदा कोणी हातात घेणार नाही याची काळजी घ्या, पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा, असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशानासाला दिले आहे.

मुंबईतही या संपाचा परिणाम आता मुंबईतही दिसून येत आहे. काही दिवस पेट्रोलच्या टंचाईला जाण्याच्या भीतीने मुंबईतील कुर्ल्यातील पेट्रोल पंपावर काही लोकांनी ड्रममध्ये पेट्रोल भरुन नेलं. पेट्रोलबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्याचं काही जणांनी सांगितलं. त्यानंतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.

हिट अँड रन कायदा विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलं आहे.

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारल्यानंतर पेट्रोल पंपावर आज सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी पाहिला मिळत आहे. नांदेडमध्ये काही पेट्रोल पंपावर 2 दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळपासून वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहिला मिळत आहे.

केंद्र सरकारनं मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे. या विरोधात देशभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे. त्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत.

हे आंदोलन किती दिवस चालणार? हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नाही, यामुळे एक दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. सकाळपासूनच पेट्रोल पंप मोठी गर्दी दिसून येत आहे.

राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे.

त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *