अंबादास दानवेंकडून ईव्हीएम हॅक करण्यासाठी अडीच कोटीं घेताना आरोपीला रंगेहात अटक

Accused arrested red-handed for taking 2.5 crores from Ambadas Danven to hack EVMs

 

 

 

 

ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे.

 

 

 

 

मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

 

 

 

मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील राहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात जेवढे एव्हिएम आहेत, ते सर्व हॅक करुन तुम्हाला हवा तसा निकाल देतो, असे आश्वासन देत अंबादास दानवेंना फोन केला. त्यासाठी अडिच कोटी रुपये दानवे यांच्याकडे मागण्यात आले.

 

 

 

 

या संदर्भात दानवेंना संशय आणल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीसांनी सापळा रचत अंबादास दानवे यांच्याकडे पैसे दिले.

 

 

 

 

पुण्यातील एका हॉटेलमध्ये मारुती ढाकणेला पैसे घेताना रंगेहात पकडले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

अंबादास दानवे यांच्या अडिच कोटींची मागणी करताना आरोपीने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

 

 

 

 

ईव्हिएम हॅक करुन तुम्हाला संभाजीनगरमध्ये पाहिजे तो रिजल्ट मिळवून देऊ, असं आरोपीने अंबादास दानवे यांना सांगितले.

 

 

 

त्यानंतर दानवेंनी पोलिसांना फोन करत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सापळा रचत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

 

 

 

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

तर शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. शिवाय, एमआयएमकडून इम्तियाज जलील यांनी शड्डू ठोकलाय. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *