भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादीच्या वाटेवर

BJP MLA's wife on the way to NCP

 

 

 

 

 

परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव अर्थात उस्मानाबाद लोकसभेची जागा शिवसेना-भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील ‘घड्याळ’ चिन्हावरुन मैदानात उतरणार असल्याचं निश्चित झालं आहे.

 

 

 

 

आज दुपारी तीन वाजता अर्चना पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

 

 

 

 

देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांची चर्चा झाली.

 

 

 

 

त्यानुसार अर्चना पाटील आज दुपारी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत. पक्षप्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती होत्या, मात्र सध्या त्या कोणतेही पद सांभाळत नाहीत. लोकसभेच्या माध्यमातून त्या पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

 

राणा जगजितसिंह यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. शिवसेनेच्या (आता ठाकरे गट) ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात राणा मैदानात उतरले होते. मात्र ओमराजेंनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती.

 

 

 

 

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राणा जगजितसिंह यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

 

 

त्यानंतर ते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयी झाले. याआधी २००४ ते २००८ आणि २००८ ते २०१४ या काळात दोन वेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *