मुस्लिम -मराठा हे एकगठ्ठा मतांचे समीकरण विधानसभेत टिकणार नाही ?

The equation of Muslim-Maratha votes will not last in the Legislative Assembly?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने आपली एक गठ्ठा मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दिली ,मराठवाड्यामध्ये मराठा ओबीसी असा संघर्ष निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला.

 

 

 

या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने मराठा उमेदवारांना भरभरून मते दिली, परंतु मराठा समाजाने मराठवाड्यातील एक मुस्लिम उमेदवाराला मत न दिल्यामुळे मराठवाड्यातील मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

 

 

 

मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये परभणी, नांदेड ,हिंगोली ,बीड, जालना ,लातूर या लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन दोन्ही उमेदवार मराठा असले तरी

 

 

महाविकास आघाडीच्या मराठा उमेदवाराला भरभरून मते दिली , हे पाहता मराठवाड्यामध्ये मुस्लिम आणि मराठा असे जबरदस्त एमएम फॅक्टर तयार झाले .

 

 

 

या फॅक्टरचा परिणाम मराठवाड्यात भाजप,शिवसेना महायुतीला मोठा फटका बसला. हे राजकीय समीकरण भविष्यामध्ये निर्णायक ठरेल असे राजकीय विश्लेषक सांगत होते.

 

 

 

या मतांच्या या समीकरणाने भविष्यात मराठा समाजाचे राजकीय प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत होते.

 

 

 

परंत्तू मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा एक उमेदवार सहन झाला नाही याची प्रचिती मुस्लिम समाजाला आल्याने समाजात नाराजीचा सूर आहे. ,

 

 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांमध्ये एकमेव मुस्लिम उमेदवार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात होते.

 

 

 

तर महायुतीकडून संदिपान भुमरे मैदानात होते. महायुतीच्या विरोधात मराठा समाज मतदान करताहेत आणि सोबत मुस्लिम मतदान हा प्याटर्न असल्यामुळे

 

 

 

मराठा समाज अशावेळी मराठा समाजाकडून इम्तियाज जलील यांना मतदान करेल हि मुस्लिम समाजाची अपेक्षा होती त्यामुळे

 

 

मराठा आणि मुस्लिम हे मराठवाड्यात तयार झालेले समीकरण औरंगाबाद मध्ये मुस्लिम उमेदवाराला मराठा समाजाने मतदान दिल्यामुळे हे अधिक भक्कम होईल अशी आशा सर्वत्र व्यक्त होत होती .

 

 

 

मुस्लिम समाजाकडून सुद्धा मराठा समाज इम्तियाज जलील यांना मतदान करणार असल्याचे बोलले जात होते मराठा समाजाकडूनही तश्या प्रकारचे संकेत देण्यात येत होते

 

 

 

परंतु मराठा समाजाने अतिशय गुप्त पद्धतीने संदिपान भुमरे यांना एक गठ्ठा मतदान करून भुमरेंना लाखोच्या मताधिक्याने विजयी करून मराठा समाज हा फक्त इतर समाजाचे मतदान घेतो

 

 

मात्र इतर समाजाला मतदान देत नाही हे करून दाखविल्याचे चर्चा आता औरंगाबाद मतदारसंघात होत आहे. संदिपान भुमरे हे मराठा आहेत आणि इम्तियाज हे मुस्लिम आहेत

 

 

 

त्यामुळे त्यांना मतदान न केल्याचे मुस्लिम समाजामध्ये चर्चा आहे . यामुळे आता भविष्यात विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि मराठा हे तयार झालेले समीकरण टिकणे अशक्य दिसत आहे,

 

 

कारण मुस्लिम समाजातील विचारवंताकडून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. मराठा समाजाच्या या भूमिकेमुळे सर्वजण चकित झालेले आहेत. मराठा समाजाला भरभरून मतदान केले तरी

 

 

 

 

एका जागेवर मुस्लिम उमेदवाराला मराठा समाजाने नाकारणे या घटनेमुळे मुस्लिम समाजात नाराजीचा सूर आहे. यामुळे भविष्यामध्ये मुस्लिम समाजाकडून

 

 

फक्त कोण्या एक समाजाच्या उमेदवाराला मतदान न करता आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या विधानसभेमध्ये मतदान होण्याची शक्यता व्यक्त नाकारता येत नाही.

 

 

 

 

यामुळे मराठवाड्यामध्ये तयार झालेले मुस्लिम -मराठा हे मतांचे समीकरण आता विधानसभेमध्ये टिकणे अशक्य दिसत आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *