भीषण अपघातात चौघांचा मृत्यू;मराठवाड्यातील घटना

Four killed in horrific accident; incident in Marathwada ​

 

 

 

 

 

लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान उसाच्या ट्रक्टरला भरधाव वेगातील कारने पाठीमागून धडक दिल्यामुळे तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.३) पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. नांदेड येथील पाच तरूण एम. एच. २६ बी. सी. ८२८६ क्रमांकाच्या कारमधून लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते.

 

 

 

लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रापाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा ऊस लातूरच्या कारखान्याकडे घेऊन जात असलेल्या ट्रक्टरला पाठीमागून कारने जोराची धडक दिली.

 

 

 

 

कारच्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी इतर तिघांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

 

 

 

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मयताच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असून त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

 

 

कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) रा. किल्लारोड नांदेड, मोनु बालाजी कोतवाल (वय २७), नरमण राजाराम कात्रे (वय ३३), कृष्णा यादव रा. नांदेड यांचा अपघातात मृत्यू झाला असून शुभम किशोर लंकाढाई रा. नांदेड हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *