IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या

Suicide of IPS officer's wife

 

 

 

 

गुजरातमधील आयपीएस अधिकारी आरटी सुसारा यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

 

१ डिसेंबरला अहमदाबाद येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे. शालूबेन असं आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीचं नाव आहे. शालूबेन यांचा मृतदेह घरात एका खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

 

 

शालूबेन या सूरत येथे गेल्या होत्या. गुरुवारी रात्री सुरतहून अहमदाबादला आल्यानंतर त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासादरम्यान उघडकीस आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने

 

 

बोडकदेव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शालूबेन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

 

 

 

२०११ बॅचचे आयपीएस अधिकारी आर टी सुसारा हे सध्या सूरतमधील हजीरा येथे पोलीस अधीक्षक म्हणून मरीन टास्क फोर्समध्ये कार्यरत आहे. सुसारा आणि त्यांची पत्नी सूरतमध्ये एका लग्नासाठी गेले होते.

 

 

तेथून गुरुवारी दोघे परतले. त्यानंतर घरात सुसारा यांना तळमजल्यावर एका खोलीत बायकोचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना कळवले.

 

 

पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता शालूबेन यांनी रात्री उशीरा आपले जीवन संपवल्याचे समोर आले. परंतु अद्याप त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *