भाजप आमदारांविरोधात पोलिसांत तक्रार;पाहा काय आहे प्रकरण ?

Police complaint against BJP MLAs; see what is the case? ​

 

 

 

 

 

भाजपचे आमदार संजय कुटे यांनी भर सभेत दलित महिला सरपंचाचा अवमान केला. यानंतर सभास्थळ सोडलेल्या सरपंचांनी तामगाव पोलिसांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.

 

 

 

जळगाव जामोद मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडले. यादरम्यान संग्रामपूर तालुक्यातील

 

 

 

वरवट बकाल येथील एका पुलाचेही भूमिपूजन पार पडले. यावेळी जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

वरवट बकालच्या दलित महिला सरपंच संगीता इंगळे यांनी आपल्या भाषणात वरवट बकाल येथे कार्यान्वित ‘डायलिसिस सेंटर’वर स्थानिक सरपंचाचे नाव डावलल्याचा मुद्दा उपस्थित केला.

 

 

 

मी दलित असल्यामुळे माझं नाव वगळण्यात आल्याचा थेट आरोप त्यांनी केला. यामुळे सभास्थळाचे वातावरण तापले. खा. प्रतापराव जाधव यांच्या समोरच हा आरोप केल्याने आ. संजय कुटे यांचा पारा चढला

 

 

व त्यांनी महिला सरपंचांना भाषण थांबवण्याचे फर्मान दिले. यावर महिला सरपंचांनी भाषण आटोपते घेत संजय कुटे यांच्या बाजूला बसल्या.

 

 

 

यावेळी खासदारांचे भाषण सुरु असतानाच आमदार कुटे यांनी सरपंच इंगळे यांना धारेवर धरलं , यामुळे सरपंच इंगळे सभेतून निघून गेल्या.

 

 

 

सरपंच पदाला तुच्छ लेखून महिलेचा अवमान करणे आमदार कुटे यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. आमदार कुटे यांच्या विरोधात सरपंच इंगळे यांनी तामगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

 

 

या तक्रारीत संजय कुटे यांनी मी दलित असल्याने, माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, असे सरपंच इंगळे यांनी म्हटले आहे.

 

 

 

दरम्यान, आज रविवारी सकाळी विचारणा केली असता ‘हे प्रकरण चौकशीवर असल्याचे’ तामगाव पोलिसांनी सांगितले . आमदारांनी

 

 

प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. रिपाइंचे सचिन खरात यांनी कुटे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *