महाविकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर टेन्शन वाढविणार

Prakash Ambedkar of Mahavikas Aghadi will increase the tension ​

 

 

 

 

महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरु केली आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत बैठकांचा सिलसिला सुरु आहे.

 

 

मात्र या बैठकांमधून अद्यापही ठोस निर्णय समोर आलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या मागणीमुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.

 

 

वंचित बहुजन आघाडीने सम-समान जागावाटपाचा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यातही आता महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईत देखील

 

 

2 जागेची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या 30 जानेवारी रोजी महविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे.

 

 

 

मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा या दोन मतदारसंघांची मागणी वंचित करणार असल्याची शक्यता आहे. आज वंचितचे नेते सुजात आंबेडकर दोन्ही मतदारसंघांचा दौरा करणार आहे.

 

 

वंचितच्या नवीन मागणीमुळे इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी ठाकरे गट मुंबईत 4 जागेवर लढण्याच्या तयारीत तर काँगेस पण मुंबईत 3 जागेवर लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.

 

 

तर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एका जागेची मागणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापतरी दिसत नाही.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *