कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू;मराठवाड्यातील घटना

A terrible car accident; Three died on the spot; incident in Marathwada ​

 

 

 

 

 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघाताचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सलग दुसऱ्या दिवशी समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे.

 

 

भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही.

 

 

राहुल आनंद निकम (वय ४७), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास

 

 

 

त्यांची कार दौलताबाद परिसरात आली. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून जात असलेल्या अज्ञात वाहनांना धडकली.

 

 

 

हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातावेळी कारच्या एअरबँग उघडल्या. पण कुणाचाही जीव वाचला नाही.

 

 

 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.

 

 

 

 

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही महिन्यांपासून खंडित झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर भीषण अपघात झाला होता.

 

 

 

यामध्ये शिर्डीला दर्शनासाठी निघालेले ३ जण ठार झाले होते. शनिवारी (ता. १०) सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर पुन्हा अपघात झाला. यामध्येही तिघांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

दरम्यान या अपघाताच्या 24 तास आधी अहमदनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात

 

 

 

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या स्विफ्ट कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तुटलेल्या ट्रेलरला धडक बसली. या भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले.

 

 

 

जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

 

 

 

 

तीन दिवसांपूर्वी याच परिसरात कल्याणमधील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

 

 

 

स्विफ्ट कारमधून पाच जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात होते. कारने खराब झालेल्या कंटेनर ट्रेलरला मागून धडक दिली.

 

 

 

या अपघातात स्विफ्ट कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला.

 

 

 

दरम्यान कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *