काँग्रेसकडून राज्यातील 19 जागेवर संभाव्य उमेदवारांची नाव आली समोर

The names of possible candidates for 19 seats in the state have come out from Congress

 

 

 

 

राज्यातील महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून येत्या 9 मार्चला ती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते,

 

 

 

पदाधिकारी आणि आमदारांची मतं जाणून घेतली. मुंबई सोडून राज्यातील या 19 ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून उमेदवारांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

 

 

 

काँग्रेसने मुंबई सोडून गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, हिंगोली, नांदेड, रामटेक,नागपूर , अमरावती अकोला, लातूर , जालना,नांदुरबार, धुळे, कोल्हापूर, सांगली,

 

 

 

सोलापूर, पुणे ,भिवंडी या मतदारसंघातील उमेदवारांचा आढावा घेतला. तर उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून त्यावर अजून तोडगा निघायचा आहे.

 

 

 

कोणत्या मतदारसंघात काँग्रेसने कोणाच्या नावाची चाचपणी केली ते पाहू,
1. गडचिरोली- नामदेव उसेंडी, नामदेव किरसान

2. भंडारा-गोंदिया- सर्व अधिकार नाना पाटोले यांना

 

 

 

 

3. यवतमाळ-वाशीम- शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, जीवन पाटील

4. चंद्रपूर- प्रतिभा धानोरकर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे

 

 

 

5. हिंगोली- प्रज्ञा सातव

6. नांदेड- वसंतराव चव्हाण, आशा शिंदे

 

 

7. रामटेक- रश्मी बर्वे, कृणाल राऊत, राजू पारवे, किशोर गजभिये

8. नागपूर – विकास ठाकरे, अभिजित वंजारी, प्रफुल गुलधे

 

 

 

9. अमरावती- बळवंतराव वानखेडे, किशोर बासेकर

10. अकोला- डॉ अभय पाटील, अशोक आमणकर

 

 

 

 

11. लातूर – सर्वस्वी अधिकार अमित देशमुख यांना

12. जालना- कल्याण काळे, विलास अवथडे , संजय लाखेपाटील

 

 

 

 

13. नांदुरबार- केसी पाडवी, शिरीष नाईक किंवा त्यांच्या पत्नी

14. धुळे- कृणाल पाटील, श्याम सनेर, तुषार शेवाळे

 

 

 

 

15. कोल्हापूर- शाहू महाराज

16. सांगली- विशाल पाटील

 

 

 

17. सोलापूर- प्रणिती शिंदे

18. पुणे – रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे.

 

 

 

19. भिवंडी – दयानंद चोरघे, सुरेश तावरे

 

 

 

राज्यातील महाविकास आघाडीची बुधवारी महत्त्वाची बैठक झाली असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही भाग घेतला होता.

 

 

 

वंचितचा प्रस्ताव मविआने स्वीकारला असून त्यावर 9 मार्च रोजी अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही मतभेद नसून वंचितला सोबत घेऊन

 

 

 

लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या काही जागांवर वंचितने दावा केला असून त्यावरच चर्चा करण्यात आली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *