वसमत येथील जवान सिक्कीममध्ये अपघातात शहीद

Soldier from Wasmat martyred in an accident in Sikkim

 

 

 

 

 

 

 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या मौजे गुंज येथील भारतीय सैन्य दलातील जवान शहीद झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

 

 

 

सिक्कीम मध्ये कर्तव्यावर असताना वाहनाचा अपघात झाला आणि या अपघातात जवान शहीद झाल्याची बातमी कळाली.

 

 

 

अपघात झाल्याची माहिती कुटुंबीयांना बुधवारी, २२ मे रोजी मिळाली. अंकुश एकनाथ वाहुळकर वय (२४) असं शहिद झालेल्या जवानाच नाव आहे.

 

 

 

 

गुंज येथील जवान अंकुश हे २०२१ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. त्यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे गुंज आसेगाव या गावी घेतले.

 

 

 

 

माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सैन्य दलात जाण्याचा त्यांनी निश्चय केला होता. त्यांनी परभणी येथून भरती झाल्यानंतर आपलं सैन्य दलातील प्रशिक्षण पूर्ण केले व कर्तव्यावर रुजू झाले होते.

 

 

 

 

 

मागील पंधरा दिवसांपूर्वी ते सुट्टी संपवून परत देश सेवेसाठी गेले होते.देश सेवा आणि कर्तव्याला प्राधान्य देणारा जवान शहिद झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

 

 

 

अंकुश यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, बहिण असा परिवार आहे. शहीद अंकुश वाहुळकर यांचे पार्थिव सिक्कीम येथून गुरुवारी,२३ मे रोजी सकाळी हैदराबाद येथे आणले जाणार आहे.

 

 

 

 

त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रात्री उशिरापर्यंत गुंज या जन्मगावी आणले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शुक्रवारी, २४ मे रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *