हिंगोली जिल्ह्यात वसमत 11, कळमनुरी 19 आणि हिंगोलीमध्ये 23 रिंगणातील उमेदवारांची संपूर्ण माहिती
Complete details of candidates in Hingoli district Vasmat 11, Kalmanuri 19 and Hingoli 23
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील विधानसभा मतदारासंघांमध्ये 53 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत.
त्यामध्ये 92-वसमत 11, 93-कळमनुरी 19 आणि हिंगोलीमध्ये सर्वाधिक 23 उमेदवार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज सांगितले.
आज सोमवारी (दि.04) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी संपल्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, 126 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरविण्यात आले होते.
त्यापैकी 73 उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली असून 53 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. विधानसभा निहाय निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या 40 तर 29 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, 11 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तसेच 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या 31 होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून
19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची संख्या 55 होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 32 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले
असून 23 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगिले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवाराचे नाव, पक्ष आणि निवडणूक चिन्हांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदारसंघ
1. चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- घड्याळ
2. दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार- तुतारी वाजवणारा माणूस
3. नागिंदर भिमराव लांडगे, बहुजन समाज पार्टी- हत्ती
4. गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज (बापु), जन सुराज्य शक्ती- नारळाची बाग
5. जैस्वाल प्रिती मनोज, वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर
6. मुंजाजी सटवाजी बंडे, राष्ट्रीय समाज पक्ष- शिट्टी
7. जगन्नाथ लिंबाजी अडकिणे, अपक्ष-ट्रम्पेट
8. तनपुरे मंगेश शिवाजी, अपक्ष- कात्री
9. बांगर रामप्रसाद नारायणराव, अपक्ष-टेबल
10. रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी, अपक्ष-अंगठी
11. रामचंद्र नरहरी काळे, अपक्ष-एअर कंडिशनर
93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
1) बांगर संतोष लक्ष्मणराव – शिवसेना –धनुष्यबाण
2) विजय माणिकराव बलखंडे – बहुजन समाज पक्ष-हत्ती
3) डॉ. संतोष कौतिका टारफे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल
4) अफजल शरीफ शेख – रिपब्लीकन सेना – कपाट
5) डॉ. दिलीप मस्के (नाईक)-वंचित बहुजन आघाडी- गॅस सिलेंडर
6) मुस्ताक ईसाक शेख – हिंदुस्तान जनता पार्टी- ट्रम्पेट
7) मेहराज अ. शेख मस्तान शेख – ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए- मिल्लत-एअर कंडिशनर
8) शिवाजी बाबुराव सवंडकर- महाराष्ट्र स्वराज्य पक्ष-पेनाची निब सात किरणांसह
9) संजय तुळशीराम लोंढे- राष्ट्रीय समाज पक्ष –शिट्टी
10) अजित मगर – अपक्ष-बॅट
11) उद्धव बालासाहेब कदम – अपक्ष-मोत्यांचा हार
12) जाबेर एजाज शेख – अपक्ष-अंगठी
13) टार्फे संतोष अंबादास – अपक्ष –आईस्क्रीम
14) टार्फे संतोष लक्ष्मण – अपक्ष –चिमणी
15) देवजी गंगाराम आसोले – अपक्ष -कढई
16) पठाण जुबेर खान जब्बार खान – अपक्ष-ऊस शेतकरी
17) पठाण सत्तार खान –अपक्ष-बेबी वॉकर
18) प्रकाश विठ्ठलराव घुन्नर – अपक्ष-शिवणयंत्र
19) इंजिनिअर बुद्धभूषण वसंत पाईकराव – अपक्ष-सफरचंद
94- हिंगोली विधानसभा मतदारसंघ
1) प्रमोद उर्फ बंडू कुटे- महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन
2) मुटकुळे तान्हाजी सखारामजी –भारतीय जनता पार्टी – कमळ
3) रुपालीताई राजेश पाटील- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मशाल
4) ॲड. साहेबराव किसनराव सिरसाठ – बहुजन समाज पार्टी – हत्ती
5) ॲड. उत्तम मारोती धाबे- अखंड हिंद पार्टी- रोडरोलर
6) दिपक धनराज धुरिया – भारतीय जनसम्राट पार्टी – डोली
7) पंजाब नारायण हराळ- राष्ट्रीय समाज पक्ष – शिट्टी
8) प्रकाश दत्तराव थोरात – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
9) मुत्तवली पठाण अतिक खान ताहेर खान – मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी – शिवणयंत्र
10) रवि जाधव सवनेकर – अभिनव भारत जनसेवा पक्ष – अंगठी
11) सर्जेराव निवृत्ती खंदारे – ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी – बॅट
12) सुनील दशरथ इंगोले- भीमसेना – ऑटोरीक्षा
13) सोपान शंकरराव पाटोडे- बहुजन भारत पार्टी – ट्रम्पेट
14) ॲड. अभिजीत दिलीप खंदारे – अपक्ष – बॅटरी टॉर्च
15) आनंद राजाराम धुळे- अपक्ष – ऊस शेतकरी
16) अ. कदीर मस्तान सय्यद (गोरेगावकर)- अपक्ष – कॅमेरा
17) गोविंद पांडुरंग वाव्हळ- अपक्ष –प्रेशर कुकर
18) गोविंदराव नामदेव गुठ्ठे – अपक्ष – बाकडा
19) भाऊराव बाबुराव पाटील – अपक्ष -टेबल
20) मुक्तारोद्दीन अजिजोद्दीन शेख – अपक्ष – हिरा
21) रमेश विठ्ठलराव शिंदे – अपक्ष – स्पॅनर
22) विमलकुमार सुभाषचंद्र शर्मा – अपक्ष- दुर्बिण
23) सुमठाणकर रामदास पाटील – अपक्ष –कपाट