17-परभणी लोकसभा ;जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मतदानाची फायनल आकडेवारी

17-Parbhani Lok Sabha; District officials gave the final statistics of voting

 

 

 

 

 

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दूसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवार, (दि.26) रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.

 

 

 

 

परभणी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण अंदाजे 60.09 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

 

 

 

परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 290 मतदान केंद्रातून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

 

 

 

 

 

यामध्ये 95-जिंतूर विधानसभा मतदार संघात 55.17 टक्के तर 96-परभणी 60.07 टक्के, 97-गंगाखेड 62.02 टक्के, 98-पाथरी 63.44 टक्के, 99-परतुर 59.42 टक्के

 

 

 

 

आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 60.09 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, परभणी लोकसभा मतदार संघात सरासरी अंदाजे एकुण 60.09 टक्के मतदान झाले आहे.

 

 

 

 

 

परभणी लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान यंत्र कडक सुरक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ,

 

 

 

 

परभणी येथील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्ट्राँग रुम्समध्ये सुरक्षीतरित्या आणण्यात आल्या आहेत. आलेली सर्व मतदान यंत्रे आयोगाचे निरिक्षक,

 

 

 

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी, उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सिल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *