संतप्त आमदारांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांला कोंडले

The angry MLAs lashed out at the Tehsildar and Agriculture Officers

 

 

 

 

बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडलं.

 

 

आमदार नितीन देशमुख यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे

 

 

आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या आमदार नितीन देशमुखांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

 

 

अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला.

 

शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत.

 

 

या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती.

 

या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि

 

कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *