मराठा आरक्षण ; जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी बजावल्या २६ शिक्षकांना नोटीसा
Maratha Reservation; Notice to 26 teachers issued by Zilla Parishad Chief Officer
मराठा आरक्षणाच्या मागणीचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्याप्रकरणी जालन्यातील शिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
ओबीसी नेत्यांच्या तक्रारी वरून 26 मराठा शिक्षकांना वॉट्सअपला स्टेट्स ठेवल्या प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या
मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ही नोटीस पाठवली आहे. यावरुन आता मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बदनापूर तालुक्यातील नानेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ईश्वर गाडेकर या शिक्षकाने मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा समाजाविरुद्ध आक्षेपाहार्य पोस्ट केल्याची घटना घडली होती.
त्यावर मराठा समाजाकडूनजिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकूण 30 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
त्या नंतर ग्रामस्थ आणि शिक्षकांना एकत्र बोलवत मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दोन्ही बाजूच्या तक्रारी आयकत त्यावर दिनांक 7 फेब्रुवारीला सुनावणी ठेवली होती.
अशातच जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा शिक्षक आरक्षण मागणीचे स्टेट्स स्वतःच्या सोशल मीडियाला ठेवत असल्याचा आक्षेप घेतला होता,
त्यावर आज मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी 26 मराठा शिक्षकांना 7 फेब्रुवारीला सुनावणीला उपस्तित राहण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. यामुळे मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासन एका ओबीसी नेत्यांचे ऐकून सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप मराठा समजाकडून केला जात आहे. मराठा शिक्षकांनी आरक्षण मिळावं म्हणून सोशल मीडियावर काही पोस्ट टाकल्या असतील
तर ते त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, त्यांच्यावर कुणी गदा आणू नाही. मुख्यकार्यकरी अधिकारी जर सुडाच्या भावनेने हे कृत्य करत असेल तर त्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.