आता “या” कामासाठी लागणार नाही 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क
Now there will be no stamp duty of Rs 500 for this work.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.शासकीय आणि शालेय कामकाजासाठी लागणाऱ्या
सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. या निर्णयाने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सदर निर्णयामुळे एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहावा लागणार आहे.साध्या अर्जावर तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे.
तसेच दहावी,बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांना प्रतिज्ञापत्र लागते त्यासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार आहे.सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.
जात पडताळणी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह
शासकीय कार्यालयात देण्यात येणारे प्रतिज्ञापत्र