मनोज जरांगेंचे सरकारला अल्टिमेटम;नऊ मार्चपर्यंत निर्णय घ्या,नसता …..

Manoj Jarange's ultimatum to the government; take a decision by March 9, if not...

 

 

 

 

 

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

 

 

 

जरांगेंनी उपोषणादरम्यान फडणवीसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. फडणवीसांचं राजकारण आणि मराठाद्वेष यावर त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांचे आरोप सुरुच आहेत.

 

 

 

 

मनोज जरांगेंनी आता फडणवीसांना आत्येची उपमा देत, ते कसे कान भरतात, यावरुन टीकास्र सोडलं. माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, माझी हत्या करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव आहे.

 

 

 

माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. शिवाय पोलिसांना हाताशी धरुन कान भरण्यचा उद्योग सुरु आहे.

 

 

 

”देवेंद्र फडणवीसांनी एसपींचे कान फुंकले आहेत, पीआय, पीएसआय यांचेही कान फुंकले आहेत. गृहमंत्री हे जबाबदारीचं पद आहे. परंतु ते कान फुंकण्याचं काम करीत आहेत.

 

 

ग्रामीण भागामध्ये पूर्वी मुल जन्माला आलं की आत्या त्याचे कान फुंकायची. सध्या देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहेत.” अशी बोचरी टीका जरांगेंनी केली.

 

 

 

सरकारला पुढील आंदोलनाचा इशारा देत त्यांनी म्हटलं की, राज्य सरकारने सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे. ८ किंवा ९ तारखेपर्यंत आम्ही त्याची वाट बघू.

 

 

नाहीतर ते किती दडपशाही करतात, ते बघून घेऊ. माझ्यावर हल्ला करण्याचा डाव रचला जातोय. कार्यकर्त्यांकडून किंवा महिलांच्या अडून हल्ला केला जाऊ शकतो.

 

 

 

परंतु मी मागे हटणार नाही, आता बाहेर पडतोय. मीपण बघून घेणार आहे. असं म्हणत जरांगेंनी ९ तारखेपर्यंत सरकारच्या निर्णयाची वाट बघणार असल्याचं म्हटलं आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *