सततच्या वापरातील ‘या’ पेनकिलरमुळे किडनी, हृदयाला गंभीर धोका; सरकारकडून अलर्ट जारी
Serious risk to kidneys, heart due to 'these' painkillers in continuous use; Alert issued by Govt
घरोघरी पेनकिलर म्हणून वापरलं जाणारं मेफ्टाल प्लास औषधाबद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे. भारताच्या फार्माकोपिया आयोगानं मेफ्टालसंदर्भात महत्त्वाची माहिती शेअर करत अलर्ट जारी केला आहे.
मेफ्टालमध्ये असलेल्या मॅफेनॅमिक ऍसिडचे धोकादायक साईड इफेक्ट्स होऊ शकतात. मेफ्टालच्या सेवनामुळे इओसिनोफिलिया आणि सिस्टिमॅटिक सिंप्टम्स सिंड्रोम होण्याचा धोका आहे. मेफ्टालच्या सेवनामुळे किडनी आणि हृदयाला गंभीर धोका उद्भवू शकतो.
मेफ्टाल प्लास औषधात मॅफेनॅमिक ऍसिडचा वापर केला जातो. सामान्य वेदना, सूज, ताप, दातदुखी, मासिक पाळीच्या वेदना, हाडांचा आजार (ऑस्टियोआर्थराइटिस) यावर मेफ्टाल प्लासचा वापर केला जातो.
दिलेल्या माहितीनुसार, आयपीसीनं सुरक्षेशी संबंधित अलर्ट जारी केला आहे. फार्माकोविजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया (पीव्हीपीआय) डेटाबेसमधून मेफ्टालच्या साईड इफेक्ट्सच्या प्राथमिक विश्लेषणांमधून DRESS सिंड्रोम होण्याचा धोका समोर आला आहे.
ड्रेस सिंड्रोम काही औषधांमुळे होणारा आजार आहे. या सिंड्रोममुळे गंभीर ऍलर्जी होते. त्वचेवर लाल रंगाचे चकते येतात. ताप येतो आणि लिम्फ नोड्सना सूज येते.
औषध घेतल्यानंतर दोन ते आठ आठवड्यांमध्ये ही ऍलर्जी होते. यासंबंधीचा अलर्ट भारतीय फार्माकोपिया आयोगानं जारी केला आहे.
‘मेफ्टाल प्लासच्या वापरामुळे होणाऱ्या साईड इफेक्टच्या शक्यतांकडे बारकाईनं लक्ष द्या,’ असं आवाहन डॉक्टर, रुग्ण आणि ग्राहकांना करण्यात आलं आहे.
मेफ्टाल प्लासचा वापर प्रिस्क्रिप्शनशिवाय करता येत नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडिकलमधून हे औषध मिळत नाही.
पण तरीही भारतात या औषधाचा वापर विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. लहान मुलांना अधिक ताप असल्यासही हे औषध वापरलं जातं. डोकेदुखी, मांसपेशींमधील वेदना, सांधेदुखेतही मेफ्टाल प्लास वापरली जाते.