शिंदे गटाच्या नेत्यावर भाजप आमदाराकडून गोळीबार

Shinde group leader fired by BJP MLA ​

 

 

 

 

 

भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला.

 

 

 

हिललाईन पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

“महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे

 

 

 

जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढलं जात आहे”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते

 

 

“महेश गायकवाड कोण आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांच्यावर आमदारानेच गोळीबार केला, हा प्रकार धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहे.

 

 

ते आम्हाला कायदा शिकवतात. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन, हे प्रकरण फक्त गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापुरतंच मर्यादीत नाही”, अशी टीकाही राऊतांनी केली.

 

 

 

“आज महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पोलिसांच्या कॅबिनमध्ये गोळीबार होतो. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे,

 

 

तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

 

 

 

“भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला,

 

 

असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

 

 

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

 

 

 

महेश गायकवाड गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

 

 

 

कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती. शुक्रवारी रात्री मात्र पुन्हा दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले

 

 

 

महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकापाठोपाठ एक अशा ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांना देखील यावेळी गोळी लागली.

 

 

 

याप्रकरणी हिल लाईन पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतलंय. ते पुढील तपास करत आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती मिळतेय. या घटनेनंतर कल्याण पूर्वेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

 

 

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ५ गोळ्या झाडल्यात. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. अशात खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.

 

झालेल्या घटनेमुळे आलेलं हे अपयश पोलिसांचं नाही तर राज्याच्या गृहमंत्री आणि भाजपचं आहे. आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे आम्ही काही करू शकतो, असं त्यांना वाटतं. पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होत असेल तर गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे.

 

 

 

मी लोकसभेत हा मुद्दा मांडणार आणि केंद्रीय गृहमंत्री यांना भेटणार, यांची चौकशी झाली पाहिजे याची मागणी करणार आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केलीये.

 

 

 

माध्यमांशी संवाद साधताना पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमची टीका वयक्तीक नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या आधी महाराष्ट्रात असं कधी झालेलं नाही. राज्यात सध्या भयानक गँगवॉर सुरू आहे.

 

 

 

राऊत जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, कॅबिनेटमध्ये नाही तर आता गँगवार रस्त्यावर आले आहेत. त्यांना आता कुणाचीही भीती राहिलेली नाही. पोलिसांची भीती नाही, कॅमेऱ्यासमोर ते गोळ्या झाडतात.

 

 

 

जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा राज्यात गुन्हे वाढतात. गेल्यावेळी ते गृहमंत्री होते तेव्हा नागपूर इज क्राइम कॅपीटल ऑफ महाराष्ट्रा असं अनेक चॅनल्स म्हणायचे.

 

 

 

हा गुंडाराज तुमच्यासाठी असेल. आम्ही अजूनही स्वाभिमानाने जगतो. सरकार त्यांना काही शिक्षा करणार नसेल तर आम्ही त्यांच्याविरोधात लढू, असं सुप्रिया सुळेंनी ठामपणे सांगितलं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *