शरद पवारांवर दादा गटाची टीका ;मटण खात नाही पण रस्सा चालतो

Criticism of Dada group on Sharad Pawar; He does not eat mutton but the broth works

 

 

 

विरोधक भाजपा व मित्र पक्षांवर टीका करत असून भाजपा मधील नेत्यानी स्वतःच्या पक्षात प्रवेश केलेला चालतो. “मटण खात नाही पण रस्सा चालतो”

 

अशी शरद पवार गटाची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केली आहे.

 

नाशिक मधील घड्याळ युवा संवाद व मानवी साखळी अभियानावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, श्रेयांश भावसार,

 

जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधूने, योगिता आहेर, संजय खैरनार, योगेश निसाळ, नितीन चंद्रमोरे, अमोल नाईक, रामेश्वर साबळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

 

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरु आहेत. अशातच महायुती सरकार मधील काही जण विरोधी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तेच सांगतात.

 

सूरज चव्हाण म्हणाले की, “मटण खात नाही पण रस्सा चालतो. या म्हणीप्रमाणे विरोधकांची अवस्था झाली आहे. भाजप सोबत युती चालत नाही. पण भाजपची लोकं चालतील,” अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

 

विरोधक हे फक्त जाती-धर्माचे राजकारण करत असून राष्ट्रवादी फक्त विकासाच्या मुद्द्यावर व केलेल्या कामांच्या जोरात जनतेसमोर जात आहे.

 

त्यामुळे पुन्हा महायुतीचेच सरकार येणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

 

 

यावेळी अंबादास खैरे म्हणाले कि, महायुती सरकार मधील अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात अनेक जनहितार्थ योजनांची घोषणा केली.

 

सदरची योजना जनते पर्यंत पोहचविण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी

 

योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याकरिता घडयाळ युवा संवादाचे आयोजन केले असून आगामी निवडणुकांमध्ये नाशिक मधील जागा सोडून घेतल्यास युवकांच्या जोरावर भरघोस मताधिक्याने निवडून येतील.

 

 

अजित पवार भाजपासोबत सत्तेत आली ते केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी लाडकी बहीण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, युवा प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा,

 

अन्नपूर्णा योजना, गाव तिथे गोदाम योजना, मोफत तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना, लेक लाडकी योजना उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ व मंत्री मंडळाने आणल्या.

 

यासारख्या विविध आकर्षक योजना आगामी निवडणुकीत जनतेपर्यंत पोहोचाव्यात याकरिता घडयाळ युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यानंतर कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ शेकडो युवा पदाधिकाऱ्यांनी मानवी साखळी केली होती. विविध कल्याणकारी योजनांचे

 

फलक हातात घेऊन “एकच वादा –अजित दादा,” “राष्ट्रवादीचा वादा-धन्यवाद दादा” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *