बनावट नोटांसह चार अटकेत

Four arrested with fake notes

 

 

 

 

बुलढाणा जिल्ह्यात बनावट चलनी नोटासह 14 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही जण खामगाव येथील असल्याची माहिती पाेलिसांनी देण्यात आले.

 

 

बनावट नाेटा प्रकरणाची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली हाेती. या गुप्त माहितीनूसार खामगाव अकोला रोडवरील टेम्भूर्णी गावाजवळ

 

 

पाेलिसांनी नाकाबंदी केली. या मार्गावर एक कार येताना पाेलिसांना दिसली. त्या कारला थांबवून पोलिसांनी कारची झडती घेतली.

 

 

त्यात चिल्ड्रेन बँकेच्या 6100 रुप्याचे 61 बंडल आढळून आले. प्रत्येक बंडल वर व खाली एक 500 रुपयांची खरी नोट चिकटवलेली होती. तसेच सहा मोबाईल, सेलोटेप, कैची, कारला बनावट नंबर प्लेट मिळून आली.

 

 

 

पाेलिसांनी एकूण 14 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारमधील चारही जण फसवणुकीच्या उद्देशाने निघालेचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *