मराठवाड्यात भाजप खासदारांच्या बहीण काँग्रेसच्या वाटेवर?

In Marathwada, the sister of BJP MPs on the way to Congress? ​

 

 

 

 

 

शेतकरी कामगार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. आज दुपारी मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

 

 

आशाताई शिंदे या लोहा कंधार विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आणि भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर

 

 

 

यांच्या बहीण आहेत. आशाताई शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत.

 

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्याने नांदेडमध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला आहे. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

 

 

 

तर, दुसरी कडे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहे. पुढील रणनीती आखायला काँग्रेसने सुरुवात देखील केली आहे.

 

 

 

त्यातच आता काँग्रेस पक्षाने शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांना गळाला लावण्यात यश मिळवले आहे, अशी माहिती आहे. पक्ष प्रवेशानंतर काँग्रेस कडून आशाताई यांना मोठी जवाबदारी देणार असल्याची माहिती आहे

 

 

आशाताई शिंदे ह्या शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आहेत. मागील पाच वर्षांपासून त्या शेकाप पक्षात सक्रीय आहेत.

 

 

शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा लोहा मतदार संघातील समस्या त्या सोडवण्यासाठी नेहमी सक्रिय असायच्या. अनेक कार्यक्रमात पती श्यामसुंदर शिंदे यांच्या सोबत राहायच्या. विधानसभा निवडणुकीत पतीला निवडणून आणण्यासाठी त्यांनी गावोगावी प्रचार देखील केला.

 

 

 

आशाताई शिंदे या भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बहीण आहेत. मागील चार वर्षांपासून या बहीण भावामधील कौटुंबिक वाद सर्वश्रुत आहे. कार्यक्रम आणि सभेतून दोघांनी एकमेकांना आव्हान देखील दिले आहे.

 

 

 

दरम्यान, विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही कुटुंब एकत्र आल्याने व्यक्तिगत पातळीवरील वाद निवळला होता, मात्र आता आशाताई शिंदे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश झाल्यास राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

अशोक चव्हाण यांनी लोकसभेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करुन राज्यसभा खासदारकी मिळवली आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत आशाताई शिंदे यांना काँग्रेस उमेदवारी देऊन लढतीत रंगत आणणार का हे पाहावं लागेल.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *