वसमत विधानसभा; सोमवारपर्यंत 27 उमेदवारांचे अर्ज

Wasmat Assembly; Applications of 27 candidates till Monday

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये  हिंगोली जिल्ह्यात 63 इच्छुकांनी 115 अर्जांची उचल केली आहे. तर 64 जणांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

 

आज नामनिर्देशन प्रकियेच्या पाचव्या दिवशी 92-वसमत विधानसभा मतदार संघात 16 इच्छूक उमेदवारांनी 21 अर्ज, 94-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 21 इच्छूक

 

उमेदवारांनी 36 अर्ज व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघात 26 इच्छूक उमेदवारांकडून 58 अर्ज असे जिल्ह्यात एकूण 63 इच्छुकांकडून 115 अर्जांची उचल झाली आहे.

 

92-वसमत विधानसभा मतदारसंघात आज 18 उमेदवाराचे 27 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. यामध्ये 1) रावसाहेब दाडेगांवकर सांळूके यांनी (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार) पक्ष-2 व अपक्ष-2 असे एकूण 4 अर्ज, 2)

 

नाथराव तातेराव कदम (अपक्ष) 2 अर्ज, 3) श्रीमती राजश्री नाथराव कदम (अपक्ष) 2 अर्ज, 4) मारोती रामराव क्यातमवार यांनी इंडियन नेशनल काँग्रेस पक्ष-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज,

 

5) बाबुराव उर्फ बबन रामचंद्र दिपके (अपक्ष)-1, 6) नावनाथ साहेबराव कुऱ्हे (अपक्ष) -1 , 7) रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी (अपक्ष) -2 अर्ज, 8) बाळासाहेब नामदेव मगर (अपक्ष) – 1,

 

9) विष्णु उत्तम जाधव (अपक्ष)-1, 10) बांगर रामप्रसाद नारायणराव (अपक्ष)-1, 11) श्रीमती उज्वलाताई तांभाळे यांनी भाजपा-1 व अपक्ष-1 असे 2 अर्ज, 12) मिलिंद राजकुमार यंबल (अपक्ष)-2 अर्ज,

 

13) रामचंद्र नरहरी काळे (अपक्ष)-1, 14) शेख फरीद उर्फे मुनीर इसाक पटेल (अपक्ष)-1, 15) गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज (जनसुराज्य शक्ती)-1, 16) अंकुश तातेराव आहेर (अपक्ष)-1,

 

17) श्रीमती प्रिती मनोज जयस्वाल (वंचित बहूजन आघाडी)-1, 18) पुष्पक रमेशराव देशमुख (अपक्ष)-1 अशा 18 इच्छूक उमेदवारांनी 27 नामनिर्देशपत्र दाखल केले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *