पाथरीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदेनी मानले मनोज जरांगे पाटलांचे आभार ;पहा काय घडले ?
Chief Minister Shindeni Maan thanked Manoj Jarange Patal at the campaign meeting in Pathrit; see what happened

मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई सामाजिक आहे, राजकीय नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग न घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले.
या मतदारसंघात मराठा समाजाने आपणास पाठींबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरु केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत. विरोधकांचे हे गैरप्रकार मराठा समाजाने हाणून पाडावेत,
विरोधकांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही केले.परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी (दि.23)
पाथरीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, आदी उपस्थित होते.
या सरकारने आरक्षण देतेवेळी कुणबीचे दाखलेसुध्दा वितरीत करणे सुरु केले. विरोधकांनी कधी कुणबी म्हणून या समाजास एकसुध्दा दाखला दिला का? असा सवाल करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टिकेचे झोड उठविले.
एकीकडे चंद्रावर माणसे जावू लागली असतांना दुसरीकडे स्वतःच्या घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्या मंडळींना आम्ही जोरदार करंटचा झटका दिला.
तो एवढा की, ती मंडळी आता पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरु लागले आहेत. त्यांच्या गळ्याचे आणि कंबरेचे पट्टेसुध्दा निघाले आहेत, असा टोला शिंदे
यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. घरी बसून कारभार करणार्यांनी रस्त्यावर उभे राहून सेवा करणार्यांना शिकवायचा प्रयत्न करु नये, असा इशारासुध्दा दिला.
देश पुढे जातो आहे, जलदगतीने विकास होतो आहे. प्रगतीकडे दररोज एक एक पाऊल पडत आहे. सर्वच क्षेत्रात विकासाने मोठी झेप घेतली आहे.
राज्य सरकारनेसुध्दा केंद्र सरकारच्या मदतीने अनेक योजनांना मोठा वेग दिला आहे. एका पाठोपाठ एक कामे पूर्ण होत आहेत. परभणीसारख्या मतदारसंघातसुध्दा तीन हजार कोटींची कामे सुरु आहेत.
त्यापैकी काही कामे मार्गीसुध्दा लागली आहेत. या कामांमध्येसुध्दा स्थानिक खासदारांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता, अशी टिका करतेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जालना-नांदेड समृध्दी महामार्ग,
नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यातून जाणार आहे. परभणी महानगराच्या भूमिगत गटार योजना, मलनिस्सारण योजना, महानगरांतर्गत रस्ते यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून
आचारसंहितेनंतर सर्व कामे युध्द पातळीवर सुरु होणार आहेत. सेलूतील 242 हेक्टर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला आहे. मतदारसंघांतर्गत प्रगती आणि रोजगार निर्मितीचे मार्ग डबल इंजिन सरकारने खूले केले आहेत, असे ते म्हणाले.