मुसळधार पाऊस ;विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला,नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी

Heavy rains; Vidarbha Marathwada communication lost, heavy rains in Nanded district

 

 

 

नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

 

आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे.

 

 

काल सकाळी दहा वाजता पासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

 

किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत 136 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी,उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे.

 

किनवटपाठोपाठ हिमायतनगर, माहूर,हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे,

 

तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यातील सर्वच तालुक्यापेक्षा विक्रमी पावसाची नोंद हि किनवट माहुर तालुक्यात होत असते

 

परंतु चालू पावसाळ्यात पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवल्याने नदी नाले कोरडीच होती पण दि.१ च्या मध्यरात्री पासून मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने

 

तालुक्यास झोडपून काढल्याने नाल्याचे व वळणाचे पाणी शेतशिवारात शिरल्याने सोयाबीन कापूस तुर अशा खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले.

 

 

अधिच खते बि बियाण्याच्या महागाईतुन होरपळून पेरणी केली खरीप हंगामावर वरुन राजाने कृपादृष्टी दाखवित माफक प्रमाणात पाणी पडल्याने खरीपाचा हंगाम बहरला होता.

 

 

त्यामुळे शेतकऱ्यांना सुगीचे दिवस चांगले येतील. अशी आशा बाळगुन हसु फुलले होते पिके ऐन फुल पातीवर असतानाच दि १ रोजी च्या मध्यरात्री पासून तालुक्यात वार्‍याच्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने काहीतासातच

 

आजवर कोरडी ठाक असलेल्या नाल्यांना पुर असल्याने या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकास शिरल्याने शेकडो हेक्टरावरील उभी पिके आडवी झाल्याने सुगीच्या दिवसाचे स्वप्न पाहाणार्‍या शेतकऱ्यांच्या स्वपनावर विरजन पडले

 

असुन खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाच्या वतीने पिक नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथील काही भागातील नागरीकांच्या घरासह दुकानात पुराचे पाणी शिरल्याने दुकातील मालाची व नागरीकांच्या जिवन आवश्यक वस्तुची नासाडी झाली.

 

तर ग्रामिण भागातील छोट्या मोठ्या नाल्याच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहिले. विदर्भ मराठवाडा जोडणार्‍या धनोडा येथिल पैनगंगा नदी पात्रावरील पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने विदर्भ मराठवाडा संपर्क तुटला

 

नदीवर नुतन पुल उभारण्यात आला पण पुलाच्या दोन्ही बाजुने राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम रखडल्याने पुल रहदारी साठी खुला करण्यात आला नाही तर जुना पुल हा निजाम कालीन असल्याने

 

पुल या पहीले देखिल उखडून गेल्याने कमपुवत झाला एखादी मोठी दुर्घटना घडुन जिवित हाणी होण्याअगोदरच या कडे नांदेड व यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *