राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि इन्कम टॅक्स चे छापे
ED and Income Tax raids at various offices of Rajmal Lakhichand Jewellers
जळगावमधील नामांकित ज्वेलर्स आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना ईडीने जबरदस्त झटका दिला आहे.
जळगाव मधील आर एल अर्थात राजमल लखीचंद समूहा विरोधात ईडी कडून नागपूर येथील विशेष न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
स्टेट बँकेच्या थकीत 525 कोटीच्या कर्जाप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या 3 फिर्यादीनुसार 17 ऑगस्ट 2023 रोजी ईडी कडून जळगाव नाशिक व ठाणे येथे
एकाच वेळी आर एल समूहावर छापेमारी करण्यात आली होती. छापीमारीत ईडीने महत्त्वाचे दस्तावेज जप्त व 87 लाख रुपये जप्त करत कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे दागिने व आरएल समूहाची स्थावर मालमत्ता जप्त केली होती.
तर नागपूर येथील ईडी कार्यालयात आर एल समुहाचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन व त्यांच्या पत्नी तसेच माजी आमदार मनीष जैन व त्यांचे दोन मुलं यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
या कारवाई प्रकरणी 27 जुलै रोजी नागपूर विशेष न्यायालयात तक्रार दाखल केल्याची माहिती ईडी कडून प्रसिद्धी पत्रकार द्वारे देण्यात आली आहे.
ईडी कडून तक्रार दाखल करण्यात आली असली तरी न्यायालयाकडून अद्याप आपल्याला कुठलाही समन्स अथवा नोटीस मिळाली नसल्याचे आर एल समुहाचे संचालक
ईश्वरलाल जैन यांनी स्पष्ट केले. ईडी कडून करण्यात आलेली कारवाई ही चुकीचीच, कारवाई करताना कुठलाही कायदा ईडीकडून पाळला गेला नाही असा ईश्वरलाल जैन यांचा आरोप आहे.
जळगावात राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या विविध कार्यालयांवर ईडी आणि आयकर खात्याकडून एकाचवेळी छापेमारी करण्यात आली होती.
मुंबई,नागपूर,संभाजीनगर येथून ईडी पथकाच्या दहा गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या. दोन्ही खात्याच्या सुमारे 20 अधिका-यांकडून ही छापेमारी करण्यात आली.
राजमल लखीचंद ज्वेलर्स ही राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्या मालकीची आहे.. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे 15 वर्ष खजिनदारही होते.
राजमल लखीचंद ज्वेलर्ससह त्यांच्या मुंबई, नाशिकसह विविध ठिकाणच्या सहा कंपन्यांवर छापेमारी करण्यात आली होती.