महायुतीमध्ये परभणीसाठी ओढाताण ;असा असेल महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला?

Struggle for Parbhani in Mahayuti; Will this be Mahayuti's formula for Lok Sabha seat allocation? ​

 

 

 

 

 

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये

 

 

जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल याबाबत माहिती समोर आली होती.

 

 

 

भाजप २८, शिवसेना १० आणि राष्ट्रवादी १० असा फॉर्म्युला असण्याची चर्चा राजकी वर्तुळात होती. मात्र आता काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.

 

 

 

शिवसेना भाजपसोबत गेली त्याचवेळी त्यांची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. त्यांना आता दयेवर जगावं लागेल. त्यामुळे शिंदे गटाला आता लोकसभेला मनाप्रमाणे जागा मिळतील असं वाटत नाही.

 

 

 

रामटेक, परभणी यासह इतर जागांवर घोळ सुरू आहे. शिंदे गटाला ८-९ पेक्षा जास्त जागा देण्याची भाजपची मानसिकता नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

 

 

 

राष्ट्रवादीला ४ ते ५ जागा आणि शिंदे गटाला ८ ते ९ जागा भाजप सोडेल, अशी आतली माहिती आमच्याकडे असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

 

 

भाजप 34 जागेवर लढण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या या निर्णयावर शिवसेना, राष्ट्रवादी काहीच बोलू शकणार नाहीत. कारण दिल्लीचा आदेश यांच्यासाठी अंतिम असतो, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.

 

 

आपल्या डोक्यावरचा फेटा आणि पगडी कधीच दिल्ली दरबारी अर्पण करून आले आहेत. तुम्ही म्हणाल तेच करू आणि तुमचे शब्द पडू देणार नाही,

 

 

असा अलिखित करार करून महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादीला लगावला आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *