परभणी जिल्ह्यातील चार विधानसभेत सोमवारी 66 उमेदवारी अर्ज दाखल

66 candidature applications were filed on Monday in four legislative assemblies in Parbhani district

 

 

सोमवार, दि 28 ऑक्टोबर 2024 रोजी वितरण केलेले नामनिर्देशन पत्र व उमेदवारांनी दाखल केलेले नामनिर्देशन पत्राची माहिती मतदारसंघनिहाय पुढीलप्रमाणे-

 

95- जिंतूर विधानसभा मतदारसंघ – 10 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. तर समीरराव गणेशराव दुधगावकर (अपक्ष), प्रेक्षा विजय भांबळे (अपक्ष), डॉ. प्रभाकर रंगराव बुधवंत यांनी अपक्ष व राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक,

 

शेख सलीम शेख इब्राहीम (ऑल इंडिया मजलीस ई इन्कनाब ई मिलत), मेघना दिपक साकोरे बोर्डीकर (भाजप), राजीव किसनराव पंचागे (अपक्ष), मुंजाजी साहेबराव कदम (अपक्ष), अंकुश सिताराम राठोड (अपक्ष), प्रसाद ज्ञानेश्वर काष्टे (अपक्ष), गणेश जगन्नाथ काजळे (अपक्ष),

 

सुरेश कुंडलीकराव नागरे यांनी अपक्ष व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रत्येकी एक, अमृता सुरेशराव नागरे (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत 50 उमेदवारांना 90 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 11 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन पत्र सादर केले. आजपर्यंत 23 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

 

96- परभणी विधानसभा मतदारसंघ – 17 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर अली खान मोईन खान (अपक्ष), अ. पाशा अ. गफार खुरेशी यांनी अपक्ष व बहुजन समाज पार्टीच्यावतीने प्रत्येकी एक अर्ज, किशोर सखाराम रनेर (अपक्ष), नासेर शरीफ शेख यांनी

 

अपक्ष व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने प्रत्येकी एक, सय्यद समी सय्यद साहेबजान (वंचित बहुजन आघाडी), बालाजी नामदेवराव मोहिते (अपक्ष), सावित्री कालिदास महामुनी (राष्ट्रीय समाज पक्ष), आनंद शेषराव भरोसे (शिवसेना),

 

गजानन विश्वनाथ जोगदंड (अपक्ष), फारुख खान रऊफ खान (अपक्ष), त्रिंबक देविदास पवार यांनी अपक्ष व मराठवाडा मुक्ती मोर्चाच्यावतीने प्रत्येकी एक, गोविंद रामराव देशमुख (अपक्ष), छत्रगुण गणेशराव आवचार (अपक्ष), राजकुमार पुरभाजी एंगडे (बहुजन समाज पार्टी),

 

सय्यद नौमान हुसैनी सय्यद उस्मान हुसैनी यांनी अपक्ष व इंडियन युनियन मुस्लीम लिगच्यावतीने प्रत्येकी एक, राहुल वेदप्रकाश पाटील (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), संप्रिया राहुल पाटील यांनी अपक्ष व शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने प्रत्येकी एक, सय्यद अतीक उर रहेमान

 

यांनी अपक्ष व इंडियन नॅशनल काँग्रेसच्यावतीने प्रत्येकी एक, महेमूद खान (अपक्ष), अब्दुल रज्जाक अब्दुल रहेमान (अपक्ष), मोहम्मद गौस शेख अमीर यांनी अपक्ष व ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुस्लिमिन पक्षाच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत एकूण 81 उमेदवारांना एकूण 137 नामनिर्देशन पत्र वितरीत करण्यात आले आणि एकूण 24 उमेदवारांनी एकूण 33 नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

 

 

97- गंगाखेड विधानसभा मतदारसंघ – 11 उमेदवारांनी 17 अर्ज घेतले. तर शिरीन बेगम मोहमद शफीक यांनी अपक्ष व ऑल मजलिस-ए-इतेहदूल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाकडून प्रत्येकी एक, बाळासाहेब हरीभाऊ निरस यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) कडून प्रत्येकी एक, संजय साहेबराव कदम (अपक्ष), कदम विशाल विजयकुमार (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे), भगवान ज्ञानोबा सानप (अपक्ष),

 

सिताराम चिमाजी घनदाट (वंचित बहुजन आघाडी), माधव सोपानराव शिंदे (राष्ट्रीय मराठा पार्टी), स्मिता संजय कदम (अपक्ष), मदन सीताराम रेनगडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी), विष्णुदास शिवाजी भोसले (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), मुंजाजी नागोराव जोगदंड (अपक्ष), विठ्ठल जीवनाजी रबदडे (अपक्ष), श्रीकांत दिगांबर भोसले (अपक्ष), प्रवीण गोविंदराव शिंदे (अपक्ष), नामदेव रामचंद्र गायकवाड (अपक्ष), लक्ष्मण शंकरराव शिंदे (अपक्ष), आजपर्यंत एकूण 105 अर्ज विक्री झाले. तर 20 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

 

 

98- पाथरी विधानसभा मतदारसंघ – 17 उमेदवारांनी 34 अर्ज घेतले. तर वरपुडकर सुरेश (इंडियन नॅशनल काँगेस), रंगनाथ मोहनरावे सोळंके (अपक्ष), अर्जुन ज्ञानोबा भिसे (अपक्ष), राम उर्फ रामराव अच्युतराव शिंदे (अपक्ष), गोविंद मदन घाडगे (अपक्ष), अरुण सीतारामजी कोल्हे (अपक्ष),

 

माधवराव तुकाराम फड (अपक्ष), गयाबाई माधवराव फड (अपक्ष), बापुराव रावसाहेब कोल्हे (अपक्ष), नितीन रामराव लोहट (अपक्ष), नारायण तुकाराम चव्हाण (मराठवाडा मुक्ती मोर्चा), निर्मला उत्तमराव गवळी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), राजेश उत्तमराव विटेकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),

 

सुरेश किशनराव फड (वंचित बहुजन आघाडी), दादासाहेब रामराव टेंगसे (अपक्ष), जगदीश बालासाहेब शिंदे (अपक्ष), सईद खान शुरगुल खान (राष्ट्रीय समाज पक्ष), सचिन सुरेश निसर्गध (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. आजपर्यंत 26 उमेदवारांनी 29 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. तर 81 जणांनी 188 अर्ज घेतले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *