हिंगोलीत महिलांचे फोटो लावून भामट्यानी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ
In Hingoli, a bhamtya took advantage of the Ladki Bahin scheme by posting photos of women.

लाडकी बहीण योजनेत अर्ज मागे घेतलेल्यांमध्ये चक्क चार पुरुषांचा समावेश असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे फोटो लावून अर्ज केल्याचे आले समोर आले आहे.
आतापर्यंत सहा हप्ते उचलल्यानंतर चार पुरुषांची योजनेतून माघारीसाठी अर्ज केला आहे, त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतून आठ महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.. मात्र या आठ अर्जांपैकी चार अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आलंय. या चार पुरुषांनी लाडकी बहिण योजनेचे सहा हप्ते देखील उचलले आहेत.
1)शिवाजी मुंजाजी भांडे
2)महेश शिवाजी भांडे
3)गजानन रामराव काळे
4)रामराव संतोबा काळे अशी यांची नावे आहेत.
योजनेच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे फोटो अर्जावर लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्या गेले असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेत आता पडताळणी सुरू झाल्यानंतर या पुरुषांनी आपले अर्ज मागे घेतले असावेत. या चारही पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी दिली आहे.
राज्यातील ज्या ज्या महिलांच्या नावे कार किंवा त्यापेक्षा मोठी गाड्या चार सहा, आठ, दहा, बाराचाकी वाहने आहेत, अशा जवळपास साडेआठ ते दहा लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय याद्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
त्या यादीतील महिलांच्या नावावरील वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही, याची पडताळणी आजपासून अंगणवाडी सेविका करणार आहेत. आठ दिवसांत पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा, असे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.
विभानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. मात्र, योजनेंतर्गत अनेक अपात्र महिलांनी अर्ज केल्याचं पुढे आलंय या महिलांविरोधात कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .
ज्या महिलांकडे चारचाकी गाडी आहे, तर काही महिलांना स्वतः नोकरी करत असल्याने त्यांना वगळण्यात येणार आहे. खरं तर लाडकी बहीण योजना सुरु झाली, तेव्हा सरकारने काही निकष निश्चित केले होते. मात्र, या महिलांनी हे निकष न पाळता, अर्ज दाखल केले