वैद्यकीय अधिकाऱ्याला 20 हजार रुपये घेताना रंगेहात अटक

Medical officer arrested red-handed while taking 20 thousand rupees

 

 

 

 

जालना जिल्ह्यातील एका घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. कारण अबंड येथील उपजिल्हा रुग्णालयांच्या आवारात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कनिष्ठ लिपिकाला

 

 

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोग्य कॅम्पसाठी 20 हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात अटक केली आहे.

 

 

 

 

डॉ. शामकांत दत्तात्रय गावंडे आणि पंडित भीमराव कळकुंबे असं अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.

 

 

 

आरोग्य कॅम्प घेण्यासाठी प्रत्येक कॅम्पचे एक हजार रुपयांप्रमाणे 25 कॅम्प साठी 25 हजारांची मागणी या दोघांनी केली होती.

 

 

 

 

तडजोडी अंती 20 हजाराची लाच घेताना या दोघांना अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यानेच लाच घेतल्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

 

प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री आणि जामखेड केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडेच लाच मागितल्याने एकच खबळ उडाली आहे. तक्रारदाराने त्यांच्या

 

 

 

आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये मानव विकास अंतर्गत घेतलेल्या आरोग्य शिबिराची बिले पडताळणी करून मंजुरी करिता पंचायत समिती अंबड, जालना येथे पाठविली होती.

 

 

 

 

 

आरोग्य अधिकारीच लाच मागत असल्याने दाद मागायची कुणाकडे म्हणून या वैद्यकीय अधिकाऱ्याने औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली यानंतर ही कारवाई करण्यात आली.

 

 

 

 

या घटनेने आरोग्य विभागतील लाचखोरीपणा समोर आला असून अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

 

 

 

 

दरम्यान, लाच घेतल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि कनिष्ठ लिपक यांना अटक केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस (Police) करत आहेत.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *