अचानक रास्ता रोको आंदोलनाने वसमत रोडवर वाहतूक ठप्प;घंटागाडीच्या काचा फोडल्या
Suddenly the Rasta Roko movement stopped the traffic on Wasmat Road; the windows of the hourglass were broken.

परभणीशहरातील वसमत रोडवरील दुभाजकांत खांबांवर लावण्यात आलेले भगवे झेंडे, बॅनर्स आणि होर्डिंग महानगर पालिकेच्या कर्मचार्यांनी काढून घंटागाडीत टाकल्याने रविवारी
(दि.28) वीरशैव समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत कै. वसंतराव नाईक पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. दादागिरीने झेंडे आणि बॅनर काढणार्या
अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत रास्ता रोकोही केला. त्यामुळे वसमत मार्गावरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली होती.
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी (दि.28) अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा वर्धापन दिन व सेवा जनशक्ती पार्टीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने शहरातील प्रमुख मार्गावर स्वागताचे बॅनर्स, होर्डिंग लावण्यात आले होते. वसमत रोडवरील दुभाजकांत कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले होते.
दुपारी 1 वाजेच्या सुमारास मनपाच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्यांनी भगवे झेंडे व बॅनर्स काढून घंटागाडीत जमा केले. याची माहिती कळताच वीरशैव युवक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
भगवे झेंडे व बॅनर्स काढणार्या कर्मचार्यांना जाब विचारला. मात्र वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनुसार झेंडे काढल्याचे त्यांनी सांगितले. परंतू बॅनरवर महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा असल्याने
त्यांचा अवमान केल्या प्रकरणी संबंधित अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करत संतप्त जमावाने वसंतराव नाईक चौकात ठिय्या आंदोलन केले. घंटागाडीच्या काचा फोडण्यात आल्या.