ओबीसी योजनांच्या अटी व शर्थी बाबत बैठकीत मोठा निर्णय

Big decision in the meeting regarding terms and conditions of OBC schemes ​

 

 

 

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

 

 

 

या मागणीला ओबीसी बांधवांचा विरोध असून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ओबीसी बांधवांचा रोष क्षमवण्यासाठी आज भाजप ओबीसी मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

 

 

 

ओबीसी समाजातील रोष क्षमवण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप ओबीसी सेलची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ओबीसी समाजातील बडे नेते उपस्थित होते.

 

 

या बैठकीत ओबीसी ओबीसी योजनांतील अटी व शर्थी शिथिल करण्याबद्दल निर्णय झाल्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे. तसेच या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना तळागाळात राबवण्याबद्दल निर्णय झाला.

 

 

 

तसेच प्रत्येक विधानसभेत १ हजार विश्वकर्मा लाभार्थी तयार करणार येणाऱ्याचा निर्णयही या बैठकीत झाला. या योजनेअंतर्गत राज्यात ३ लाख लाभार्थी तयार करणार येणार असून प्रत्येक लाभार्थ्याला १ ते ३ लाख रुपयांचे बिनव्याजी

 

 

कर्ज देणार मिळणार आहे. तसेच या योजनेतून तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी वाटण्याचे भाजपचे नियोजन आहे. पुढील एका महिन्यात ही योजना राबवण्यात येणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *