नांदेडच्या सभेत काय म्हणाले पंतप्रधान मोदी

What did Prime Minister Modi say in the Nanded meeting?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आज महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेड दौऱ्यावर आहेत.

 

 

 

 

यावेळी झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त करत इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

 

 

“छत्रपती शिवाजी महाराज की जय, संत सेवालाल महाराज, हर महादेव, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरूवात केली.

 

 

 

 

 

पहिल्या सत्रात NDA च्या बाजूने मतदान झाले आहे. ज्या लोकांनी मतदान केले नाही, त्यांनी मतदान करा, कोणालाही करा पण मतदान करा. देशाचे भविष उज्वल करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

“इंडिया आघाडीचे लोक भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांच्यामध्ये निवडणूक लढण्याची हिंमत नाही. काँग्रेसने आधीच पराभव मान्य केला आहे.

 

 

 

 

इंडिया आघाडीचे 25 टक्के उमेदवार असे आहेत की जे एकामेकांच्या विरुद्ध लढत आहेत. इंडिया आघाडीला धडा शिकवणे गरजेचे आहे.

 

 

 

 

एव्हढा मोठा देश कोणाच्या हातात द्यायचा, हे कोणी सांगायला तयार नाहीत,” असा खोचक टोलाही मोदींनी यावेळी लगावला.

 

 

“राहुल गांधी हे वायनाड मतदार संघ देखील सोडुन पळतील. 4 जून नंतर 100 टक्के हे लोक एकमेकांचे कपडे फाडून घेतील. स्वातत्र्यप्राप्तीनंतर आम्ही पहिल्यांदा शौचालय

 

 

 

आणि इतर योजना दिल्या. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार ही मोदींची गॅरंटी आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *