मराठा आरक्षण आंदोलन ;पहा कुठे,कुठे एसटी बस बंद
Maratha reservation movement; see where, where ST bus closed
मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आलेल्या अध्यादेशावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.
मागणी मान्य होत नसल्याने राज्यभर अनेक जिल्ह्यांत मराठा बांधव आक्रमक झालेत. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.
लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने सलग तिसऱ्या दिवशी देखील चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान माजी आमदार दिनकर माने यांची गाडी मराठा तरुणांनी अडवली.
संतप्त मराठा तरुणांनी गाडीच्या समोर झोपत निषेध व्यक्त केला आहे. तसेच लातूर-सोलापूर महामार्ग मराठा तरुणांनी अडवला आहे. यावेळी त्यांनी गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिकेला रस्ता दिला.
नांदेड जिल्हयात आजही एसटी बस सेवा बंद आहे. गेल्या दोन तीन दिवसापांसून जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठीक ठिकाणी आंदोलनं होत असून रस्ते अडवले जात आहेत.
त्यामूळे एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला . शुक्रवारी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.तर काल सकाळ पासुन संपूर्ण जिल्हयात एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आलेय. दरम्यान गेल्या दोन दिवसात नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचे 80 लाखाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रभर सुरु असलेले आंदोलन शांततेत करावे. आंदोलनाबाबद आपण 21 तारखेनंतर दिशा ठरवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच यावेळी आंदोलन करतांना कुठलाच धर्म किंवा जात आडवी न येता सर्व १०वी आणि १२वी च्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाता येईन,
त्यांना पोचता येईल, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आंदोलन करण्याचं आवाहन जरांगेंनी आंदोलकांना केलं आहे.