अजित पवार गटाच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

MLAs of Ajit Pawar group met Sharad Pawar

 

 

 

राज्याच्या राजकारणात सध्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके

 

यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या घरीच ही भेट झाली.

 

 

आमदार अतुल बेनके ही अजित पवारांची साथ सोडणार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा रंगलेली आहे.

 

 

खासदार अमोल कोल्हेंच्या घरी ही भेट घडली. याला शरद पवारांनी ही दुजोरा दिला. ज्यांनी लोकसभेत आमचं काम केलं ते आमचे आहेत असं म्हणत

 

 

शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशावर सूतोवाच केले. तर, बेनकेंनी भेट घेतली म्हणून काय झालं? त्यांनाच विचारा असं म्हणत अजित पवारांनी बोलणं टाळल आहे.

 

 

जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीनंतर अतुल बेनके यांनी राजकारणात काही घडू शकतं.

 

 

विधानसभेआधी अजितदादा आणि पवार एकत्र येऊ शकतात असं सूचक वक्तव्य केले. तर, विधानसभेला सीट धोक्यात आल्याने लोक इकडे तिकडे जात असतात असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.

 

 

पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आमने सामने आले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीसाठी दोघे एकत्र आले. पालकमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली

 

 

ही बैठक झाली. खासदार शरद पवार यांच्यासह, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे हेही यामध्ये उपस्थित होते. पुण्यातील विधान भवनामध्ये बैठक झाली.

 

 

रोहीत पाटलांपाठोपाठ शरद पवारांकडून आणखी एका तरुण उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे..आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांना उमेदवारीचे संकेत शरद पवार यांनी दिलेत.

 

यावेळी आमदार किरण लहामटेला खाली बसवा आणि अमित भांगरेच्या मागे शक्ती उभं करण्याचं आव्हान शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी जनतेला केलं…

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *