मराठवाड्यात शिक्षकाने शाळेतच गाडफ़ास लावून केली आत्महत्या
In Marathwada, a teacher committed suicide by hanging himself in school

जालन्याच्या अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत दुपारच्या सुट्टीत शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. करूबा घोडके असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षक करुबा घोडके सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत आले होते. दुपारच्या सुट्टीनंतर ते एकटेच शाळेत होते. याचवेळी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी शाळेच्या पत्राला
असलेल्या अँगलला दोरीच्या सह्याने गळफास लावून आत्महत्या केली. दुपार सुट्टी नंतर शाळेत आलेल्या मुलांना ही बाब लक्षात येताच ही घटना उघड झाली.
या घटनेनंतर गावात एकच खबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच गोंदी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शिक्षकांच्या
आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडल्याचे सांगण्यात येत असून त्याआधारे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.