एकनाथ शिंदेंच्या सेनेचे उमेदवार आज जाहीर होणार?खासदारांची धाकधूक वाढली

Candidates of Eknath Shinde's army will be announced today? Khasdar's fear increased

 

 

 

 

 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

 

 

 

 

 

विशेष म्हणजे ठाकरेंपाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या सेनेच्या उमेदवारांच्या नावाची यादी देखील आजच जाहीर होणार असल्याची माहिती

 

 

 

 

शिंदे गटाचे खा. संजय मंडलिक यांनी दिली आहे. त्यामुळे कुणाला कोणती जागा मिळणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

 

 

 

महायुतीचे जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज अधिकृतपणे शिवसेना उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

 

 

शिवसेनेचे (शिंदे गट) संजय मंडलिक यांनी याविषयीची माहिती दिली आहे. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

तसेच भाजपला 30 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत. यावर पुढील दोन-तीन दिवसांत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी आज शिंदे यांच्याकडून काही जागांवरील उमेदवार जाहीर केले जाणार आहे.

 

 

 

 

‘या’ जागांची घोषणा होण्याची शक्यता?
रामटेक : राजू पारवे
वाशिम यवतमाळ संजय राठोड
ठाणे : प्रताप सरनाईक
कल्याण – डोंबिवली : श्रीकांत शिंदे
दक्षिण मध्य मुंबई : राहुल शेवाळे
मावळ : श्रीरंग बारणे
कोल्हापूर: संजय मंडलिक
हातकणंगले : धैर्यशील माने
बुलढाणा : प्रतापराव जाधव
शिर्डी : सदाशिव लोखंडे

 

 

 

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीची अद्याप प्रतीक्षा असून, आज 15 ते 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

 

 

 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजपच्या पराभवासाठी रणनीती आखली गेली असून, या बैठकीनंतर आज ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे.

 

 

 

कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 2 तास विस्तृत चर्चा झाली आहे.

 

 

 

 

राज्यात महाविकास आघाडीमध्ये एकजूट राहावी आणि जागावाटप पूर्ण झाल्यानंतर विविध आघाड्यांवर निवडणुकीसाठी व्यूहरचना आखण्यात यावी

 

 

 

याबाबत ठाकरे आणि पवारांमध्ये विस्तृत चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *