उद्धव ठाकरे यांचा आजचा नांदेड दौरा रद्द
Uddhav Thackeray's visit to Nanded canceled today
ठाकरे गट शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार होते. परंतु त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला आहे.
उद्धव ठाकरे येत असलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याच्या कारणाने हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज सकाळी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार होते. हा दौरा जाहीर झाला होता. माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख नागेश पाटील आष्टीकर
यांच्या मुलीच्या विवाहासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमदास दानवे उपस्थित राहणार होते. दरम्यान सकल मराठा समाजाने शनिवारी घेण्यात आलेल्या बैठकीत ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला होता.
उद्धव ठाकरे हे मुंबईहून नांदेडला विमानाने येणार होते. सकाळी ११ वाजता नांदेड विमानतळावर त्यांच्या आगमनाचा वेळ होता. यामुळे सकाळपासूनच ठाकरे सेनेचे नेते पदाधिकारी
नांदेड विमानतळावर हजर झाले होते. मात्र उद्धव ठाकरे यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याने ठाकरे सेनेचे नेते, पदाधिकारी नांदेड विमानतळावरून माघारी फिरले.