आरटीई प्रवेश घोटाळा; १७ पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

RTE admission scam; A case has been filed against 17 parents

 

 

 

 

 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) उत्पन्नाच्या बनावट दाखल्यासह बोगस दस्तऐवजाद्वारे पाल्यांचा शाळेत प्रवेश घेणाऱ्या तब्बल १७ पालकांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

 

 

 

कमराम समास, यश अरोरा, सूरज घोडके, मोहम्मद सुलीम अली खान, शाहबाद पीर, सलीम बेग अजीम बेग, मनीष शहाणे, शरद देवधाने, रशीद अमीन,

 

 

 

 

शाहबाद पीर खान, तारदेव पवार, शेख जावेद, शामशंकर पांडे , ब्रिजकुमार चतुर्वेदी, मोहम्मद इर्शाद आणि अनुप किशोर गणात्रा,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

 

 

या १७ पालकांनी २०२३-२०२४ या कालावधीत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेतला. शिक्षण विभागाने पालकांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची तपासणी केली.

 

 

 

 

पालकांनी सादर केलेल्या उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र व पत्त्यांच्या दस्तऐवजांमध्ये तफावत आढळली. ते बनावट असल्याचेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.

 

 

 

विभागाने या १७ पालकांना कारणे दाखवा नोटीस बजावून सुनावणी घेतली. बयाण व दस्तऐवजांमध्ये तफावत आढळल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी व पडताळणी समितीचे सदस्य रमेश हरडे

 

 

 

 

यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास केल्यास बोगस दस्तऐवज तयार करणाऱ्या रॅकेटचाही पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

शिक्षण हक्क कायदा हा आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांसाठी आहे. मात्र, काही सधन कुटुंबातील पालकही गडबडी करून या योजनेचा लाभ लाटत असल्याचे पुढे आले आहे.

 

 

 

 

 

अशा पालकांवर यापुढे करडी नजर ठेवण्यात येईल. बनावट दाखले, बोगस दस्तऐवजांची तपासणी करण्यात येईल. काही गैर आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *