जगभरातील 40 देशांत परसलाय JN.1,नव्या वर्षात कोरोनाची लाट येणार?
JN.1 spread in 40 countries around the world, will there be a wave of corona in the new year?

नवंवर्ष सुरू झालं आहे, पण नव्या वर्षाच्या उत्साहासोबत कोरोनानंही धाकधूक वाढवली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 800 हून अधिक नवे रुग्ण आढळले असून गेल्या सात महिन्यांतील एका दिवसांत विक्रमी रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उच्चांक आहे.
गेल्या आठवड्यात (24-30 डिसेंबर) भारतात कोरोनाचे 4652 रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यात हा आकडा 3818 होता. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा नवा प्रकार च्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढत आहे.
कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट जेएन-1 ची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत जागतिक स्तरावर मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या उत्साहासोबतच कोरोनाची भितीही सर्वांच्या मनात आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 841 रुग्णांची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 4,309 वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत जेएन 1 चे एकूण 178 रुग्ण आहेत.
ज्यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 83 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच, जानेवारी 2020 पासून आतापर्यंत भारतात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,50,12,484 वर पोहोचली आहे.
तर गेल्या 24 तासांच 3 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,33,361 वर पोहोचली आहे.
जागतिक स्तरावर, यूएस, काही युरोपीय देश, सिंगापूर आणि चीनमध्ये रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. डब्ल्यूएचओमधील एका डॉक्टरांनी शनिवारी बोलताना सांगितलं की,
“मर्यादित अहवाल देणाऱ्या देशांमधून, कोविड-19 हॉस्पिटलायझेशन आणि आयसीयूमध्ये गेल्या महिन्याभरात 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, इन्फ्लूएंझा आणि इतर श्वसन रोगांच्या प्रकरणे वाढत आहेत. संसर्गापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी उपाय योजले पाहिजेत.
मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाले की जेएन 1 ओळख वाढत आहे. परंतु महत्त्वाचे म्हणजे कोविड-19 ची प्रकरणे सर्व देशांमध्ये वाढत आहेत.
कोरोना विषाणू आल्यापासून त्याची रूपे वेळोवेळी बदलत आहेत. अलीकडेच, दिल्लीमध्येही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सब-व्हेरियंट चा पहिला रुग्ण आढळला आहे.
मात्र, उपचारानंतर आता हा रुग्ण बरा झाला आहे. येत्या काही दिवसांत कोविड विषाणूच्या नवीन प्रकारांचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे,
असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे पण, दिलासादायक बाब म्हणजे याची लक्षणे सौम्य आहेत.