परभणीत अवकाळी पावसाचा हैदोस ;वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
Haidos of unseasonal rain in Parbhani; heavy rain with gusty wind and thunder

रविवारी (दि.28) रात्री सव्वा दहाच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसात अनेक झाडे पडली तसेच विद्युत खांब वाकले व तारा तुटून पडल्याने
अनेक वसाहतींचा वीज पुरवठा 12 तासा पासून खंडित झालेला आहे. परभणी शहरासह परिसरात रविवारी (दि.28) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
परभणीत जवळपास अर्धा तास वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. मागील काही दिवसांत तापमानाचा पारा चाळिशी पार गेलेली आहे. दररोज दिवसभर कडक ऊन पडलेले असताना वातावरणात उष्माही कायम होता.
एकीकडे नागरिक उष्णतेने हैराण झालेले असताना अचानक रात्री सव्वा दहाव्या सुमारास आलेल्या पावसाने वातावरणात थंडावा निर्माण झाला. वादळी वारा
आणि विजांचा कडकडाट सुरू होताच महावितरणकडून होणारा वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांची मोठी गैरसोय झाली.जवाहर कॉलनी,मुमताजनगर,धार रोड शहरातील सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल परिसरात
मनपा आपत्ती निवारण टीम सकाळीच 6 वाजताच दाखल झाली आहे. पडलेली झाडे तोडणे सुरु आहे… कल्याण मंडपम आणि सुपर मार्केट ते गार्डन दोन्ही लाईन बंद आहेत
सुपर मार्केट ते देशमुख हॉटेल.. आणि कल्याण मंडपम. आणि सुयोग कॉलनी मधील झाडे तोडण्यासाठी वेळ लागणार आहे एकच टीम काम करीत आहे.
दुसरी प्रायव्हेट टीमही बोलावली आहे. काही भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला. तर इतर भागातील वीज परत येण्यासाठी दुपारपर्यंत चा वेळ लागू शकतो.
अवकाळी पावसाचा आरोग्यावर परिणाम होतो. या दिवसांत ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
वातावरण बदलातून हवेत गारवा वाढला की दमा तसेच श्वसनाचे विकार डोके वर काढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
अनेकजण व्यायामासाठी रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. पहाटेचे कोवळे ऊन व स्वच्छ हवा घेण्यासाठी धावपळ सुरू असते. सकाळचे वातावरण आरोग्याला पोषक असते. पण अवकाळी पाऊस त्यात विघ्न आणतो.
अशा दिवसात तयार होणारे प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. अशा वातावरणात दमा, ब्रॉन्कॉयटीस आणि श्वसनासंबंधी विकार होऊ शकतात.
योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुफ्फुसाचा अटॅक येऊ शकतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास होऊ शकतो.
फिरताना काय काळजी घ्यावी
नाक, डोके आणि तोंडावर रुमाल बांधावा.
त्वचेची विशेष काळजी घ्यावी.
आजार असणाऱ्यांनी
पहाटे बाहेर पडू नये.
अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
दुचाकीवरून जाताना वाऱ्यापासून बचाव करावा.
अवकाळी पावसाने थंडी वाढली की, दमा तसेच श्वसन विकारातील रुग्णांची श्वसनलिका व उपनलिका अरुंद होण्याचा धोका असतो.
यामुळे पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो. कोरोनानंतर हे विकार वाढले आहेत. यामुळे अवकाळी पावसानंतर श्वसनाचे विकार वाढतात. ॲलर्जीक ब्राँकायटीस असलेल्यांना अवकाळीनंतरच्या वातावरणाचा त्रास वाढतो.