परभणीतील उर्स च्या निविदा प्रक्रिया स्थगित
Tender process of Urs in Parbhani suspended

परभणी येथील सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्सानिमित्त राज्य वक्फ मंडळाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती बहाल केली आहे.
गेल्या वर्षीपासूनच उर्सातील मीना बाजारातील दुकानांसह अन्य स्टॉल्स व विक्रेत्यांना राज्य वक्फ मंडळाने लिलावाद्वारे बोलीने भाडे दर आकारले होते. त्यामुळे वक्फ बोर्डास निश्चितच मोठा फायदा मिळाला होता.
परंतु, यावर्षी निविदा प्रक्रिया प्रसिध्द झाल्याबरोबर त्यावर आक्षेप नोंदविण्यात आला होता , मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेतली व वक्फ बोर्डाची लिलाव प्रक्रिया सर्वसामान्य व गरीब व्यापार्यांवर अन्यायकारक आहे,
असे निदर्शनास आणून त्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. यावेळी यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अव्वर सचिव विशाखा आढाव यांनी राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना
शुक्रवार 5 जानेवारी रोजी एक पत्र पाठवून संबंधित प्रक्रिय पुढील निर्देश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत .