आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर गोळीबार ?
Shooting outside the house of MLA Santosh Bangar?

शिवसेना शिंदेगटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचा दावा ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयकानं केला आहे.
संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर फायरिंग झाल्याच्या चर्चा आहेत. 27 मे रोजी बांगर यांच्या घराबाहेर फायरिंग झाल्याचं ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर 27 मे रोजी फायरिंग झालं असल्याचं ट्वीट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी केला आहे.
त्यांच्या घरासमोरच एका व्यक्तीनं शिवीगाळ करत गोळीबार केला असल्याचा दावाही अयोध्या पोळ यांनी केला आहे. तसेच,
सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं, काय खोटं? हे सांगतील का? असा सुद्धा सवाल आयोध्या पोळ यांनी आमदार बांगर यांना विचारला आहे.
यामध्ये आमदार संतोष बांगर यांना विचारणा केली आसता, काहीही झालेलं नाही, काहीही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. थोडक्यात अशी कोणतीही घटना झाली नसल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं आहे.
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ बोलताना म्हणाल्या की, “विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शि’वीगाळ अन नंतर फाय’रिंग झाली होती म्हणे?
सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?” तसेच, अयोध्या पोळ यांनी आणखी एक ट्वीट केलं असून त्यात लिहिलंय की,
“विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार दुसरी माहिती अशी की प्रकरण दाबून ठेवले जावे म्हणून संतोष बांगर यांच्याकडून काटेकोरपणे पालन केले गेले म्हणे? सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?”असे ट्विट केले .
विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार परवा संतोष बांगर यांच्या घरासमोर आधी शि'वीगाळ अन नंतर फाय'रिंग झाली होती म्हणे?
सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं सांगतील का?#हिंगोली #मराठवाडा
— Ayodhya Poul – अयोध्या पौळ पाटील. (@PoulAyodhya) May 28, 2024