संसद परिसरात घुसणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदे बाबत बाहेर आली सविस्तर माहिती

Detailed information has come out about Amol Shinde of Latur entering the Parliament premises

 

 

 

 

संसदेतील लोकसभेच्या सभागृहात शुन्य तासाचे कामकाज चालू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेतल्या. खासदार बसलेल्या बाकांवरून उड्या मारत

 

 

या तरुणांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. या आंदोलनकर्त्यांना खासदारांनी पकडलं आणि त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं.

 

संसदेच्या सभागृहात आणि बाहेरही आंदोलन करत या आंदोलनकर्त्यांनी धुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व आंदोलनकर्त्यांची ओळख पटली आहे.

 

 

संसदेच्या बाहेर आंदोलन करणारा तरुण हा लातूरचा असून तो पोलीस भरतीची तयारी करत होता, अशी माहिती समोर आलीय.

 

 

या तरुणाचे नाव अमोल शिंदे असून तो लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील झरी(बू) या गावाचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

 

 

अमोल शिंदे यांचे आई-वडील मजुरी करतात. अमोल हा गेल्या अनेक दिवसंपासून गावात राहत नव्हता. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तो दुसऱ्या गावाला राहत होता. अमोल शिंदेंनी हे आंदोलन का केले? याचा तपास केला जात आहे.

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक यांना दूरध्वनी करून तातडीने महाराष्ट्रातील युवकासंदर्भात माहिती घेण्यास केल्या सुचना दिल्या आहेत. पोलीस यंत्रणा अमोलच्या घरी पोहोचले असून त्याच्या आई-वडिलांची चौकशी करत आहेत.

 

 

आज संसदेचे कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदार बसलेल्या बाकांवर या अज्ञातांनी उड्या मारल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला. संसदेवरील हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण होत असताना ही बाब समोर आलीय. या अज्ञातांनी उड्या मारल्यानंतर स्मोक कॅण्डल पेटवल्या. या सर्व गोंधळामुळे खासदारांची पळापळ झाली.

 

 

 

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर त्यांनी काहीतरी फेकलं यामुळे गॅस निघू लागला. दरम्यान खासदारांनी या दोघांना पकडलं आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलं. सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजता तहकूब करण्यात आलं आहे.

 

 

संसदेचं हिवाळी सत्र चालू आहे, यादरम्यान संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. संसदेच्या लोकसभेचं कामकाज चालू असताना दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. यासर्व गोंधळामुळे सभागृहात खासदारांची पळापळ झाली.

 

 

दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे. सभागृहात उड्या मारणारे तरुण हे कर्नाटकाच्या म्हैसूर येथील खासदाराच्या शिफारशीने संसदेत आले होते. म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा आहेत.

 

 

आज सकाळी संसदेबाहेर काही लोकांनी गोंधळ घातला. संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दिल्ली पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांमध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे. या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत. नीलम कौर सिंह असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचे वय ४२ वर्ष आहे.

 

 

 

या घटनेवर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे खासदार सत्यपाल सिंह म्हणाले की, लोकसभेच्या शुन्य तासाचे कामकाज चालू असताना दोन जणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या.

 

 

खाली उड्या मारल्यानंतर या दोघांनी आणलेल्या वस्तूमधून पिवळ्या रंगाची गॅस निघू लागला. हे सुरक्षेच्या अभावामुळे झालं आहे. लोकसभेच्या सुरक्षेचा भंग झालाय. दरम्यान या दोघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं आहे.

 

 

 

तर काँग्रेस खासदार कार्तिक चिंदबरम म्हणाले की, दरम्यान २० वर्षानंतर दोन तरुण प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उड्या मारल्या. त्यांच्या हातात एक डब्बा होता. त्यातून पिवळा धूर निघत होता.

 

 

या दोघांपैकी जण थेट अध्यक्षांच्या खुर्चीकडे धावून जात होता. त्यांनी घोषणाबाजी केली. डब्यातून बाहेर निघणारा धूर हा विषारी असू शकत होता. संसदेवरील हल्ल्या होण्याच्या घटनेला आज २२ वर्ष होत आहेत, त्याचवेळी अशी घटना घडणं हे सुरक्षेचा भंग आहे.

 

 

 

तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेची चौकशी केली जात असल्याचं सांगितलं. “शून्य तासात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

 

 

दिल्ली पोलिसांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, हा केवळ धूर होता यामुळे धुराची चिंता करू नका, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *