17-परभणीत किती उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त ;पाहा सर्व उमेदवारांची मते
17- How many candidates' deposits were confiscated in Parbhani ; See votes of all candidates

17-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रीकी महाविद्यालय येथे पार पडली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला.
17 परभणी लोकसभा मतदारसंघातून शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जाधव संजय (बंडू) हरिभाऊ यांना 6,01,343 मते मिळाली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार जानकर महादेव जगन्नाथ यांना 4,67,282 इतकी मते मिळाली.
यात शिव सेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जाधव संजय (बंडू) हरिभाऊ हे 1,34,061 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जाधव संजय (बंडू) हरिभाऊ यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आमदार निवडणूक निरिक्षक कृष्णकुमार निराला आणि एन. मोईनोद्दीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, आमदार राहूल पाटील,
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती.
17 परभणी लोकसभा मतदारसंघातून एकुण 34 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते प्राप्त झाली आहेत.
अ.क्र.
उमेदवारांचे नांव
पक्ष
मिळालेली मते
1
आलमगीर मोहम्मद खान
बहुजन समाज पार्टी
11062
2
जाधव संजय (बंडु) हरिभाऊ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
601343
3
कैलास बळीराम पवार (नाईक)
बळीराजा पार्टी
9520
4
डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
बहुजन भारत पार्टी
15395
5
जानकर महादेव जगन्नाथ
राष्ट्रीय समाज पक्ष
467282
6
दशरथ प्रभाकर राठोड
महाराष्ट्र विकास आघाडी
4394
7
पंजाब उत्तमराव डख
वंचित बहुजन आघाडी
95967
8
कॉम्रेड राजन क्षीरसागर
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया
6649
9
ॲड. विनोद छगनराव अंभुरे
बहुजन मुक्ती पार्टी
2041
10
श्रीराम बन्सीलाल जाधव
जय सेवालाल बहुजन विकास पार्टी
3628
11
शेख सलिम शेख इब्राहिम
ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कीलाब-ए-मिल्लत
2619
12
सयद इरशाद अली
सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया
4644
13
संगीता व्यंकटराव गिरी
स्वराज्य शक्ती सेना
2339
14
अनिल माणिकराव मुदगलकर
अपक्ष
3533
15
अर्जुन ज्ञानोबा भिसे
अपक्ष
6923
16
आप्पासाहेब ओंकार कदम
अपक्ष
3891
17
कारभारी कुंडलिक मिठे
अपक्ष
4276
18
कांबळे शिवाजी देवजी
अपक्ष
11060
19
किशोर राधाकिशन ढगे
अपक्ष
5480
20
किशोरकुमार प्रकाश शिंदे
अपक्ष
6548
21
कृष्णा त्रिंबकराव पवार
अपक्ष
10154
22
कॉम्रेड गणपत भिसे
अपक्ष
3604
23
गोविंद रामराव देशमुख
अपक्ष
3459
24
बोबडे सखाराम पडेगावकर
अपक्ष
1246
25
मुस्तफा मैनोदिन शेख
अपक्ष
1302
26
राजाभाऊ शेषराव काकडे
अपक्ष
3302
27
राजेंद्र रामदास अटकळ
अपक्ष
2812
28
विजय अण्णासाहेब ठोंबरे
अपक्ष
1959
29
प्रो. डॉ. विलास बन्सीधर तांगडे
अपक्ष
8820
30
विष्णुदास शिवाजी भोसले
अपक्ष
1860
31
समीरराव गणेशराव दुधगावकर
अपक्ष
11056
32
सय्यद अब्दुल सत्तार अजीज
अपक्ष
2650
33
सुभाष दत्तराव जावळे
अपक्ष
3434
34
ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते
अपक्ष
3539
35
नोटा
नोटा (नोटा)
3385