पाहा परभणीच्या सभेत काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
See what Narendra Modi said in the Parbhani meeting

परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. आपल्या भाषणाची सुरुवात नरेंद्र मोदींनी मराठीत केली.
चांद्रयान ,सर्जिकल स्ट्राईक ,देशाचा विकास एनडीए सरकारचा सबका साथ सबका विकास ,परभणीत ४० हजार पक्के घरे दिली,घर न मिळाल्याना मोदी तिसऱ्या टर्म मध्ये त्यांना घर,गैस मिळेल असे सांगितले,
१२ लाख हुन अधिक परिवाराला मोफत राशन देत आहे,जण औषधी केंद्रात कमी दरात औषधी ,जिल्ह्यात सव्वा लाख उज्वला कनेक्शन ,नऊ लाख पशूंना मोफत टीका लावला ,
मी सुद्धा गरीब आणि मागास परिवारातून येतो मी खूप सहन केले त्यामुळे मी जे सहन केले ते तुम्ही सहन करू नये यासाठी प्रयत्न करत आहे असं मोदी म्हणाले,
शेतकऱ्यांबाबत बोलतां ना म्हणाले या भागात सिंचनाच्या योजना काँग्रेसने रोखल्या आता शिंदे सरकार ते पूर्ण करीत आहे. लोअर दुधना प्रकल्प पूर्ण केला,शेतकऱ्यांना पीक विमा दिला.
परभणी आता देशातील खाद्यतेलमध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असल्याचे मोदी म्हणाले,आहे, जवारी,बाजरी येथील जगात जाईल असे सांगितले
आम्ही ठोस काम करतो असे ते म्हणाले परभणीत अमृत स्टेशन चा विकास , शक्तीपीठ. जालण्यात ड्राय पोर्टचा विकास ,आमचा संकल्प पत्र म्हणजे मोदी कि ग्यारंटी आहे,असे ते म्हणाले.
जिल्ह्यात तीन लक्ष घरे,७० वर्षाच्या वरच्या लोकांना सरकार मोफत उपचार करेल, आयुष्मान योजनेचा लाभ,मुद्रा योजना,तीन कोटी महिलांना लक्खपती करणार असे ते म्हणाले,
काँग्रेस आघाडीवर टीका करताना काँग्रेस विषारी वेल आहे देशाचे विभाजन केले,काश्मीरमध्ये संविधान लागू केले नाही,मराठवाड्याचा विकास होऊ दिला नाही,युद्ध ठाकरेंचा नकली शिवसेना असा उल्लेख त्यांनी केला
परभणी जिल्हा सोयाबीन,कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे असे तर सांगितले परंतु सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी पिकाला भाव नाही म्हणून परेशान आहे
त्याला काही तरी आश्वासन मोदी देतील अशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अशा होती परंतु त्यावर मोदी काहीच न बोलता त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने घुमून फिरवून विकासावर गेले. त्याच सोबत वाढती महागाई,बेरोजगारीवरही काहीच बोलले नाही
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाषणात पहिल्यांदाच अल्पसंख्याक समाजाच उल्लेख केला . ज असे म्हटले. भाजप किंवा त्यांचे नेते भाषणात आदिवासी,दलित,मराठा यांचा नामोल्लेख करत
असतात परंतु परभणीत फडणवीसांनी अल्पसंख्याचा उल्लेख चर्चेचा विषय होता .मोदींनी आपल्या जवळपास ३० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे,फडणवीस
आणि अजित पवारआणि महायुतीच्या उमेदवार शिवाय कोणत्याही नेत्याचा नामोल्लेख केला नाही. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे नांदेडमार्गे
दुपारी 12 वाजून वीस मिनिटाला परभणीत दाखल झाले . हेलिपॅडवरुन लगेचच काही मिनिटांच्या अंतरावरील सभास्थानी ते दाखल झाले .
पंतप्रधान मोदी यांच्या या प्रचार सभेतून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सभेकरीता शहरी व ग्रामीण भागातील जास्तीत
जास्त नागरीकांनी उपस्थित होते. पाथरी रोडवरील 25 एक्करावरील लक्ष्मी नगरीच्या परिसरात मोदी यांची जाहीर सभा झाली.