सा. बां. विभागाच्या भरती परीक्षेत ‘टीसीएस’ कंपनीचेच कर्मचारी पुरवत होते कॉपी ; गुन्हा दाखल

Sa. left In the recruitment exam of the department, the employees of 'TCS' company were providing copies; Filed a case ​

 

 

 

 

परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘टीसीएस’ कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेत कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

 

 

त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते.

 

 

 

लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत गोंधळ उजेडात आला होता. लातूर पोलिसांनी याचा तपास करून प्राथमिक तपासणी अहवाल सादर केला आहे.

 

 

याच्या आधारे टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उजेडात आले आहे. तलाठी भरतीमध्येही लातूर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप

 

 

 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात केला होता. या प्रकारांमुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.

 

 

 

 

कॉपी मुक्तीसाठी सरकारने कितीही तयारी केलेली असली तरी कॉपी बहाद्दरांपुढे सगळंच मातीमोल ठरत आहे. दहावी आणि

 

 

बारावीची परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबवलं जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडवला जात असल्याचं समोर आलं

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *