प्रोफेसर डॉ. हमीदुल्ला खान यांचे निधन
Professor Dr. Hamidullah Khan passes away
परभणी येथील ज्ञानोपासक कला वाणिज्य महाविद्यालयातील निवृत्त प्रोफेसर डॉ. हमीदुल्ला खान यांचे आजारामुळे आज निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय जवळपास 75 वर्षे होते . डॉ. हमीदुल्ला खान हे ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सुरुवातीपासून उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते .
उर्दू विषयाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी परभणीमध्ये उर्दू भाषेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. डॉ. हमीदुल्ला खान यांचा मन मिळाऊ स्वभाव ,
प्रत्येक विद्यार्थी, मित्र परिवाराच्या संकटाच्या काळात धावून येणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परभणी जिल्हातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात परिचित होते.
ते उर्दू विषयाचे पीएचडीचे मार्गदर्शक होते त्याच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी पीएचडी प्राप्त केल्या आहेत.
त्यांचे उर्दू विषयाचे विविध पुस्तके आज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर त्यांनी कार्य केले .
त्यांच्या कार्यकाळात ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेतलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आज राज्यभरातील महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
मनमिळाव स्वभाव , नेहमी हसरा चेहरा ,यामुळे प्रत्येकजण त्यांच्या प्रेमात पडेल असा त्यांचा स्वभाव होता. विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन देऊन विद्यार्थी घडविण्याची त्यांची हातोटी होती.
आज सकाळी आम्हाला खाण्याचे प्राणज्योत मावली त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने
मराठवाड्यातील उर्दू प्रेमी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी परभणी येथील हैदराबाद कब्रस्तान येथे त्यांचा तत्फिन अदा करण्यात आला