पुर्णा तालुक्यात समीर दुधगावकर यांचे उत्स्फूर्त स्वागत

Spontaneous reception of Sameer Dudhgaonkar in Purna Taluka

 

 

 

 

परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर दुधगावकर यांनी प्रचारात आज शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी पूर्ण तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले .

 

 

 

 

आज समीर दुधगावकर यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर, कात्नेश्वर, आहेरवाडी, माटेगाव आणि पूर्णा शहर येथे समीर दुधगावकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

 

 

 

माजी मंत्री, माजी खासदार ऍडव्होकेट गणेशराव (बापुसाहेब) दुधगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बापुसाहेब दुधगावकर यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत संवाद साधला.

 

 

 

 

यावेळी बापूसाहेब दुधगावकर यांचे सर्व जुने कार्यकर्ते, सहकारी यावेळी उपस्थित होते. समीर दुधगावकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास यावेळी बापू साहेबांच्या सहकार्यानी दिला.

 

 

 

 

 

यावेळी हाश्मी साहेब भानुदासराव शिंदे, धाराजी भुसारे, डॉ. सखाराम काळे,कोंडीबा कदम, केशवराव कदम, सटवाजी मामा मोरे, देविदास चापके शाहुराव भुसारे,

 

 

 

सरपंच उत्तमराव ढोणे, प्रकाश करहाळे, , सिताराम देसाई, सचिन देसाई आदी उपस्थित होते.एक भुमीपुत्र,जिल्ह्याच्या प्रश्नांची जाण असलेले

 

 

 

 

आणि उच्चशिक्षीत उमेदवार म्हणून समीर दुधगावकर यांना संधी द्यावी असे आवाहन यावेळी प्रा.व्यंकटेश काळे,धाराजी भुसारे यांनी केले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *