हवामान विभागाचा इशारा;४८ तासांत ‘या’ जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस

Warning of Meteorological Department; Unseasonal rain will occur in 'this' district in 48 hours

 

 

 

 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

 

 

 

दरम्यान येत्या काही दिवसांत राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे.

 

 

 

येत्या ४८ राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाची शक्यताहवामान खात्याने वर्तवली आहे. यासोबतच शेतकऱ्यांनी शेतीपिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे.

 

 

 

 

दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

 

 

 

येत्या ४८ तासांत मुंबई, पुणे ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

 

 

 

कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज आहे.

 

 

गुरुवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याणसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या देखील घटना देखील घडल्या. तर राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

 

 

आगामी ४ दिवसांमध्ये मुंबई, ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

 

 

 

मुंबईत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. तर येत्या २४ तासांत पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

 

 

 

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसातच जाणार असल्याचा अंदाज आहे.

 

 

 

आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

 

 

मुंबईमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *